चवळी आमटी - Chawli Amti
Chawli Amti in English वाढणी: ३ ते ४ जणांसाठी वेळ: २० मिनीटे (चवळी भिजलेली असल्यावर) साहित्य: १/२ कप चवळी १/४ कप कांदा, बारीक चिरून ...
https://chakali.blogspot.com/2010/05/chawli-amti.html
Chawli Amti in English
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी
वेळ: २० मिनीटे (चवळी भिजलेली असल्यावर)
साहित्य:
१/२ कप चवळी
१/४ कप कांदा, बारीक चिरून
१ मोठा टोमॅटो, प्युरी करून
२ लसूण पाकळ्या, सोलून
फोडणीसाठी: ३ टिस्पून तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १ हिरवी मिरची, ४ कढीपत्ता पाने, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टिस्पून लाल तिखट
१/२ ते १ टिस्पून कांदा लसूण मसाला
१ टिस्पून चिंचेचा घट्ट कोळ
२ टेस्पून ताजा खवलेला नारळ
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून + १ टिस्पून सजावटीसाठी
चवीपुरते मिठ
कृती:
१) चवळी साधारण ३ तास कोमट पाण्यात भिजवावी. कूकरमध्ये १ ते २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावी.
२) कढईमध्ये ३ पैकी २ टिस्पून तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतावा.
३) कांदा परतल्यावर टोमॅटो प्युरी घालावी. मध्यम आचेवर काही मिनीटे शिजू द्यावी. टोमॅटोचा कच्चा वास गेला आणि टोमॅटो शिजला कि शिजलेली चवळी घालावी. कपभर पाणी घालून ढवळावे. नंतर कांदा लसूण मसाला, चिंचेचा कोळ, नारळ आणि मिठ घालावे.
४) गरज पडल्यास पाणी वाढवून पातळपणा अडजस्ट करावा. मध्यम आचेवर काही मिनीटे उकळी काढावी.
आमटी तयार झाली कि कढल्यात १ टिस्पून तेल गरम करावे. त्यात लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात आणि चिमूटभर हिंग घालावे. हि फोडणी आमटीवर घालावी. आमटी ढवळून कोथिंबीरीने सजवावी आणि गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करावी.
टीप:
१) या आमटीमध्ये भरीला उकडून सोललेला बटाटा फोडी करून घालावा आणि थोडावेळ उकळी काढावी.
२) हि आमटी गोडा मसाला वापरूनही करता येते. त्यासाठी कांदालसूण मसाला न वापरता गोडा मसाला वापरावा आणि जोडीला २ टिस्पून किसलेला गूळ घालावा.
Labels:
Chawli Amti, Chavlichi amti, चवळीची आमटी, black-eyed beans curry

kanda lasun masala kasa karayach?
ReplyDeletethank you
sony
hi..
ReplyDeletelooks very yummy...i want try it bt dont know how to kanda lasun masala..
can u post the kanda lasun masala recipe pls
thanks
nakki post karen kanda lasun masala
ReplyDeletethanks
Hi Veidehi
ReplyDeletethanks tuza receipes khupach chan astat
pan mala kahi recipes kanda ani lasun na vaparta (jain) hawya ahet
thank you
Hi
ReplyDeleteme nakki prayatna karen tasha recipes post karaych..
chaan ahe recipe,,
ReplyDeletechavali shijavalvar tya madhil panipan amatit takaych ka ki chavaly parat dhun ghyavat
chavli shijun jar kahi pani urle tar te amtimadhye vaparle tari chalel. Kiva tyat thode taak ghalun varun toop jiryachi fodni ghalavi. agadi thodesech komat karave. jevatana patal padarth mhanun thoda changla vatato.
ReplyDeletehi vaidehi..
ReplyDeletepls share receipe of kanda lasun masala
लसुण कधी घालायची? त्यावरूनही चवीत फरक पडतो,म्हणून विचारले. धन्यवाद.
ReplyDeleteवरूणा.
लसूण आधी फोडणीत लालसर परतून घेतली तरी चालेल. किंवा आमटी तयार झाल्यावर १ चमचा तेलात लसूण ठेचून लालसर परतावी. आणि ही फोडणी आमटीवर घालावी.
ReplyDeleteOla naral nasel tar kahi option ahe ka?
ReplyDeleteola naral nasel tar thoda suka khobra bhajun tyachi thodi pud ghalavee.
Delete