शेवग्याच्या शेंगांची आमटी - Drumstick Amati (Dal)
Drumstick Dal in English साहित्य: १/२ कप तूरडाळ ७ ते ८ शेवग्याच्या शेंगांचे तुकडे (४ इंचाचे) फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोह...

https://chakali.blogspot.com/2009/02/shevagyachya-shenganchi-amati.html
Drumstick Dal in English

साहित्य:
१/२ कप तूरडाळ
७ ते ८ शेवग्याच्या शेंगांचे तुकडे (४ इंचाचे)
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
५ ते ६ कढीपत्ता पाने (Know more : Health Benefits of Curry Leaves)
४ ते ५ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/४ कप खोवलेला नारळ
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
१ ते दिड टिस्पून गोडा मसाला
१ टेस्पून गूळ
३ ते ४ आमसुलं
चवीपुरते मिठ
कृती:
१) तूरडाळ प्रेशर-कूकरमध्ये ६ ते ७ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी. नंतर शेवग्याच्या शेंगा २ ते ३ शिट्ट्या करून शिजवून घ्याव्यात. तूरडाळ आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र कूकरमध्ये शिजवू नयेत, नाहीतर शेंगा जास्त शिजतील आणि फुटतील. शेंगा शिजवताना थोडे मिठ घालावे.
२) तूरडाळ वरण निट घोटून घ्यावे. पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, मिरची, कढीपत्ता, नारळ घालून फोडणी करावी त्यात कोथिंबीर घालून १५ ते २० सेकंद परतावे. नंतर यात तूरडाळ घालावी गरजेनुसार पाणी घालावे.
३) आमटीला एक उकळी आली कि शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालाव्यात. गोडा मसाला, आमसुलं आणि मिठ घालून मध्यम आचेवर आमटी ५ मिनीटे उकळू द्यावी. नंतर गूळ घालावा आणि साधारण २ ते ३ मिनीटे उकळू द्यावी. गॅस बंद करून थोडावेळ पातेल्यावर झाकण ठेवावे.
शेवग्याची आमटी तूप-भाताबरोबर सर्व्ह करावी.
Labels:
Shevgyachya Shenganchi Amati, Drumstick dal

Hi,
ReplyDeleteVery very Tasty blog !!
I hope my mom will see this and cook such stuff for me.
I have added your link in my blog Marathi entertainment
Commentsathi ani mazya blogchi link add kelyabaddal dhanyavad...
ReplyDeleteचकली ताई आमच्याकडे ह्या शेन्गा सोलुन मग करतात ते पण छान लागत
ReplyDeleteखादाड (मि.पा)
This is very very nice recipe
ReplyDeleteTried this recipe .... Tasty drumstick Amti ... Thanks will try other recipes too👌
ReplyDelete