नारळाचे लाडू - Naralache Ladu
Coconut ladu in English सोपे आणि पटकन होणारे लाडू.. वाढणी : साधारण ८ छोटे लाडू साहित्य: २ कप खवलेला ताजा नारळ १/२ कप साखर १/२ कप दू...
https://chakali.blogspot.com/2008/09/coconut-laddu-naralache-ladu.html?m=0
Coconut ladu in English
सोपे आणि पटकन होणारे लाडू..
वाढणी : साधारण ८ छोटे लाडू
साहित्य:
२ कप खवलेला ताजा नारळ
१/२ कप साखर
१/२ कप दूध
१/२ टिस्पून वेलचीपूड
२ टेस्पून बदामाचे काप
कृती:
१) एका पातेल्यात खवलेला नारळ आणि दूध एकत्र करावे. मध्यम आचेवर उकळत ठेवावे.
२) घट्टसर होत आले कि साखर घालावी. पातेल्याच्या तळाला नारळ चिकटू नये म्हणून ढवळत राहावे.
३) वेलचीपूड आणि बदामाचे काप घालावे. मिश्रण घट्टसर होत आले कि गॅस बंद करावा आणि पातेले गॅसवरून उतरवावे.
४) मिश्रण थोडे कोमटसर होवू द्यावे. गरज पडल्यास थोडा तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत.
टीप:
१) हे लाडू नरमसर होतात. जर थोडा घट्टपणा हवा असेल तर थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावेत आणि मग खावेत.
Labels: laddu recipe, coconut laddu recipe, naralache ladu, naral ladu

Good one, I like this too:)
ReplyDeleteHi chakali
ReplyDeletetumcha blog surekh ahe. Naralachya vadya kinva ladu mala prachand avdatat. pan maza problem asa ahe ki te dudh ani naral ghalun dhavalale ki ghatta hot nahi te mishran. kahisa korad korad ch rahat. karan kay asava.
tasech frozen naralache ladu changale honar nahit ka?
Hi Anonymous,
ReplyDeletecommentsathi dhanyavad,
naralache konatehi padarth shakyanto fresh naral khavun karavet..frozen naralhi vaparu shakta.. ani vatlyas dudh ani sakhare aivaji sweetened condense milk (milkmaid)vapara...condense milk la thoda stickiness asto tyamule ladu bandhale jatil..
didi pl narali bhat kasa banavaychya sang na.
ReplyDeleteनमस्कार,
ReplyDeleteनारळीभात मी नक्की पोस्ट करणार आहे, पण आजच्या नारळीपौर्णिमेसाठी लगेच पोस्ट करणे जरा अवघड आहे. पण लवकरच पोस्ट करेन.
wow!!! tondala pani sutla pic pahun.. :) ...
ReplyDeletethanks
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteI tried this recipe but half cup of milk was not enough I added almost one cup but still it tasted little dry. I have used freshly grated coconut. Any tips for the next time?
-Manali
Hi Manali
DeleteDid you grate the coconut? It is better to scrape (using vili) the coconut to bring out the moisture.
Also, sometimes coconut are bit dry. So it will require some more milk to make moist laddus.
Hi dii pn hey ladu apn kiti divs khau shkto krn dudh use kel.aslyamule te kharab hot astil na
ReplyDeletehe ladu jast tikat nahit. Fridge madhye 5-6 divas tiktil.
ReplyDelete