उपासाची बटाटा भाजी - Batata Bhaji
Upvasachi Batata Bhaji in English वाढणी : २ ते ३ जणांसाठी साहित्य: २ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी १ टिस्पून साजूक तूप १/२ टिस्पून जिर...
https://chakali.blogspot.com/2008/07/upvasachi-batata-bhaji-maharashtrian.html?m=0
Upvasachi Batata Bhaji in Englishवाढणी : २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२ कप शिजलेल्या बटाट्याच्या फोडी
१ टिस्पून साजूक तूप
१/२ टिस्पून जिरे
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट
१ टिस्पून लिंबाचा रस
१/२ ते १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ
कृती:१) बटाटे शिजवून घ्यावेत. बटाटे सोलून त्याच्या मध्यम फोडी कराव्यात.
२) कढईत १ टिस्पून तूप गरम करावे. त्यात जिरे आणि चिरलेल्या मिरच्या घालाव्यात. यात बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर परतावे. चवीपरते मिठ आणि साखर घालावी, दाण्याचा कूट घालावा. झाकण ठेवून वाफ काढावी. २-३ मिनीटांनंतर त्यात लिंबू रस घालून मिक्स करावे.
टीप:
१) आवडीनुसार ताजा ओला नारळही घालू शकतो.
Labels:
Maharashtrian Recipe, upvas recipe, fasting recipe, batata bhaji, Potato Bhaji, Potato Sabji

I have tagged you! please check my blog!
ReplyDeleteBatate ukdun ghetana tybarobar shengdane pan ukdun ghyavet anni akkhech bhajit ghalave.
ReplyDeletemichi vatuun ghatli ki ankhi jaast zanzanit lagte hi bhaji. varichya ani sabudanyachya pithachya bhakrisobat hi khavu shakto
he pan try kara ani please mala sangaa. kharach khup chhan lagte ani bhuk pan bhagte bhakrimule. shivay hi bhakri paushtik aahe mulahi hi khavu shaktat