उपवासाचे घावन - Upavasache Ghavan
Upavasache Ghavan ( English Version ) साहित्य: १ वाटी वरी तांदूळ १ वाटी साबुदाणे २ हिरव्या मिरच्या २ चमचे नारळाचा चव २ चमचे दाण्याच...
https://chakali.blogspot.com/2008/04/upavasache-ghavan.html?m=0
Upavasache Ghavan (English Version)
साहित्य:
१ वाटी वरी तांदूळ
१ वाटी साबुदाणे
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे नारळाचा चव
२ चमचे दाण्याचे कूट
१ चमचा जिरे
चवीपुरते मिठ
साजूक तूप
कृती:
१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.
२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.
३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी.
गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.
टीप:
१) कधी कधी साबुदाणा चिकट असला तर वाफ काढल्याने घावन गदगदलेले होते आणि घावन कालथ्याने उलथायला सुद्धा त्रास होतो. म्हणून पहिल्या घावनाला वाफ काढून पाहावी. जर घावन चिकट होत असेल तर वाफ न काढता मध्यम आचेवर दोन्ही बाजू निट भाजून घ्याव्यात.
२) घावनात थोडीशी चिरलेली कोथिंबीर सुद्धा छान लागते.
3) मिरची आवडीनुसार कमीजास्त वापरावी.
चकली
Labels:
Fasting Recipes, Sabudana Ghavan, Sago Recipes, Fasting meal, Fasting food. Vari Tandul recipe, sabudana recipe

घावन काळ्या वाटण्याच्या उसळीबरोबर काय मस्त लागतात.
ReplyDeleteआता या उपवासाच्या घावनासाठी तरी उपवास करावा लागणारस दिसत.
Harekrishnaji,
ReplyDeleteधन्यवाद कमेंटसाठी,
आणि हो! उपवास नक्की करा .. घावनासाठी !! :)
वरीतांदूळ आणि साबुदाणा Combination एकदम झक्कं लागते. :)
चकली तुझया सगळ्याच पाककृती सोप्प्या आणि मुद्देसूद असतात. अगदी सुरुवातीपासून मी पंखा आहे तुझ्या ब्लॉगचा आणि ज्या प्रकारे तू इथे योजनाबदध रीतीने पाककृती मांडल्या आहेस त्याचाही :-)
ReplyDeleteह्या उपवासाच्या पदार्थात तू तेल वापरा म्हणत आहेस, उपासाला शक्यतो तेल वापरत नाहीत, तूप वापरतात, सुधारणा करता येईल का तुला वरच्या माहिती मध्ये? उपास करणार्यांच्या जिभेचा आणि भावनेचा प्रश्न आहे :-)
तुझ्या पाकनैपुण्याचा आम्हा सगळ्यांना असाच फायदा मिळत राहो.
- उपास (मायबोली )
नमस्कार प्रशांत,
ReplyDeleteतुमच्या कमेंटसाठी आभार
तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुरूस्ती केली आहे. अगदी बरोबर सुचवलेत.
तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
चकली
मी उपवास नेहमी करते पण त्यात नेहमीच्याच पदार्थांचा समावेश असतो. (साबुदाणा, चिप्स) या वेगळ्या प्रकाराने माझ्या उपवासाला नक्कीच मदत मिळणार आहे.
ReplyDeleteHello Vaidehi..
ReplyDeleteNice recipes... Really reminds me of maharashtra.. I am from mumbai.. but a tamilian...Loved all ur recipes... Can u post the recipe of farali misal?... I had it once in a place near dadar station and i loved it... can u post it if u know the recipe..
Hi Chakali,
ReplyDeleteTumachya Recipe Mala Khup Avadtat!
Thanks,
Chinmay
Dear Vaidehi,
ReplyDeleteAll your recipes are excellent. I tried many one all was superb. This recipe is very different then all Upawas Faral, Thanks for nice recipe.
With Best Regards,
Rupa
hey thanks Rupa,
ReplyDeleteYeah it is little different recipe than other Fasting recipes. and do try this recipe at home, really tastes amazing :)
Hi vaidehi,
ReplyDeleteMast recipe ahe... tujhya saglyach recipes mala atishay avadtat.. kiti sopya ani sutsutit bhashet lihites... thanks a lot.. mala cooking chi atishay avad ahe ani tujhya ya recipes mule ti anikhi vadhli ahe... pls ashach navnavin recipes amchyashi share karat raha...
Mi fan zalie ata tuzi :)
Regards
dhanyavad pallavi commentsathi
ReplyDeletehe thalipith sabudanyashiway hou shakate ka..?
ReplyDeletehi
ReplyDeletesabudanyashivay karayche asel tar shingadyache pith ghal..pan sabudana ghalun jashi chav yete tashi ekdum chan nahi yenar
1 dam mast!!
ReplyDeleteThank you snehal
ReplyDeleteHi.................
ReplyDeleteKhup chan Recepies aahet mala far aawadatat
dhanyavad
ReplyDeletehe dose naram astat ka
ReplyDeleteHo, he dose tandulachya doshasarkhe kurkurit nastat. naramach astat.
ReplyDeleteme tumchya blog chi fan ahe... kahitari vegle banvavese vatle ki ya blog cha nehmich upyog hot ala ahe..tumchya recipes ani tyanchi sangnyachi paddhat khupach chhan ahe.. ya mahashivratrisathi recipe shodhat hote he recipe milali,,, thanx a lot :)
ReplyDeleteThanks Neha
Deletehi...
ReplyDeletehe thalipith varichya pithashivay karata yeil ka?
ho pan tya aivaji dusre pith jase shingadyache kinva rajgiryache pith vaparu shakto
Delete