चिरोटे - Chirota
Chirote in English चिरोटे बर्याच प्रकारे बनवले जातात काही जण पाकातले करतात, काहीजण मैद्याचे करतात. आमच्या घरी ज्या पद्धतीत चिरोटे बनवतात ...
https://chakali.blogspot.com/2008/04/chirote.html?m=0
Chirote in English
चिरोटे बर्याच प्रकारे बनवले जातात काही जण पाकातले करतात, काहीजण मैद्याचे करतात.
आमच्या घरी ज्या पद्धतीत चिरोटे बनवतात त्याची ही कृती..
वेळ: ४५ ते ५० मिनिटे
वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे
साहित्य:
३/४ कप मैदा
१/४ कप रवा
१ टेस्पून पातळ केलेले साजूक तूप
१/४ कप दूध
वरून पेरायला पिठी साखर
पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ
कृती:
१) मैदा आणि रवा एका भांड्यात घ्यावा. त्याला १ टेस्पून गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून मैदा घट्ट भिजवावा. थोडा वेळ झाकून ठेवावे.
२) भिजवलेला मैदा ६ भागात विभागून घ्यावा. त्याचे मध्यम गोळे करून घ्यावे. त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.
३) एक लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची मध्यमसर घट्ट पेस्ट लावावी. त्यावर दुसरी पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. त्यावर तिसरी पोळी ठेवून परत पेस्ट लावावी.
४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या ३ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.
५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे.
६) हे चिरोटे दोन आकारात बनवता येतात.
पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक तुकडा वरील बाजूने हाताने हलका चेपून त्यावर उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. पातळ करू नये. किंचित जाडसर लाटावे.
दुसरी पद्धत म्हणजे गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायलाही आकर्षक दिसतात. पण यामध्ये आत लावलेली तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट तळताना बाहेर पडते आणि तूप वाया जाते.
७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउन तळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.
टीप:
१) वरील प्रमाणानुसार आपण पिठाच्या एकूण दोन गुंडाळ्या बनवल्या आहेत. तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट हि प्रत्येक गुंडाळीसाठी वेगवेगळी तयार करावी. कारण तूप घट्ट झाले तर हि पेस्ट पोळीवर पसरवता येत नाही. आणि एकदा तांदूळपिठ घातले कि ते तूप गरमही करता येत नाही.

Give us print option so that we can try.While reading it seems KHMANG Padarth for Diwali. But no use without copy, it cannot remember while making.
ReplyDeleteतांदुळ पीठी घातल्यावर तुप गरम का करता येत नाही?
ReplyDeleteHi Asmita
ReplyDeleteTup garam kele tar Tandul pith garam tupat shijanyachi shakyata aste.. mhanun pithi ghatlyavar toop garam karun naye
हे साजूक तूप म्हणजे काय भानगड आहे ? आम्ही आमच्या घरी फक्त तूप हाच शब्द वापरतो.
ReplyDeleteतूपाला साजूक तूप का म्हणतात ते मलाही माहीत नाही पण आमच्या घरी आम्ही साजूक तूप असेच म्हणतो.
ReplyDeleteतूपामध्ये दोन प्रकार असतात. वनस्पती तूप (डालडा) आणि गाई-म्हशीच्या दुधापासून बनलेले तूप, ज्याला साजूक तूपही म्हणतात. बहुदा यातील फरक दाखविण्यासाठी म्हणत असावेत.
chatakadar menu ahet ase padarth kahvun jibhevar chav rengalat rahte. mala beet juice chi recipes havya ahet.
ReplyDeleteHi Vaidehi tai mala tujha Recipe Khupa avadlya Thanks.
ReplyDeletethanks Supriya
ReplyDeletevery nice recipies.........saglya khup easy ani chaan ahet...
ReplyDeletethanks :)
ReplyDeleteMe magchya diwali la tujhi recipe try keli hoti ani khup chan chirote jhale hote .. mhanun hya diwalila parat karnar ahe ! .. Thanks for the simple directions. Happy Diwali !
ReplyDeleteAparna
thanks Aparna
ReplyDeleteHappy Diwali
Tumchya saglya recipes khup chan astat .mahatvach mhanje saglya banvayla khup easy astat .tumchyadadun khup kahi shikayla milal.thanks, vaidehi tai.
ReplyDeleteMi tuzi hi recipe try keli khup chan zali hoti
ReplyDeleteThanks
ReplyDeletekhup chhan disatahet Chirote..............Awadale
ReplyDeleteधन्यवाद
DeleteI followed your recepie of chirote.... I was successful in first attempt!!!!Thanks a lot!
ReplyDeleteKhoop chaan.simple recipe aahe.thx ya diwalit tumchya mule 1new padarth add honar.credit goes to u only.
ReplyDeleteThank you once again.