चिरोटे - Chirota

Chirote in English चिरोटे बर्याच प्रकारे बनवले जातात काही जण पाकातले करतात, काहीजण मैद्याचे करतात. आमच्या घरी ज्या पद्धतीत चिरोटे बनवतात ...

Chirote in English

चिरोटे बर्याच प्रकारे बनवले जातात काही जण पाकातले करतात, काहीजण मैद्याचे करतात.
आमच्या घरी ज्या पद्धतीत चिरोटे बनवतात त्याची ही कृती..

वेळ: ४५ ते ५० मिनिटे
वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे

chirote, chirota, maharashtrian sweets, Indian food, dessert recipe, Maharashtrian snack, sweet snack

साहित्य:
३/४ कप मैदा
१/४ कप रवा
१ टेस्पून  पातळ केलेले साजूक तूप
१/४ कप दूध
वरून पेरायला पिठी साखर
पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ

कृती:
१) मैदा आणि रवा एका भांड्यात घ्यावा. त्याला १ टेस्पून गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून मैदा घट्ट भिजवावा. थोडा वेळ झाकून ठेवावे.
२) भिजवलेला मैदा ६ भागात विभागून घ्यावा. त्याचे मध्यम गोळे करून घ्यावे. त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.
३) एक लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची मध्यमसर घट्ट पेस्ट लावावी. त्यावर दुसरी पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. त्यावर तिसरी पोळी ठेवून परत पेस्ट लावावी.
chirote, chirota, maharashtrian sweets, Indian food, dessert recipe, Maharashtrian snack, sweet snack chirote, chirota, maharashtrian sweets, Indian food, dessert recipe, Maharashtrian snack, sweet snack

४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या ३ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.
chirote, chirota, maharashtrian sweets, Indian food, dessert recipe, Maharashtrian snack, sweet snack

५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे.
chirote, chirota, maharashtrian sweets, Indian food, dessert recipe, Maharashtrian snack, sweet snack

६) हे चिरोटे दोन आकारात बनवता येतात.
पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक तुकडा वरील बाजूने हाताने हलका चेपून त्यावर उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. पातळ करू नये. किंचित जाडसर लाटावे.
chirote, chirota, maharashtrian sweets, Indian food, dessert recipe, Maharashtrian snack, sweet snack

दुसरी पद्धत म्हणजे गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायलाही आकर्षक दिसतात. पण यामध्ये आत लावलेली तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट तळताना बाहेर पडते आणि तूप वाया जाते.
७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउन तळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.

टीप:
१) वरील प्रमाणानुसार आपण पिठाच्या एकूण दोन गुंडाळ्या बनवल्या आहेत. तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट हि प्रत्येक गुंडाळीसाठी वेगवेगळी तयार करावी. कारण तूप घट्ट झाले तर हि पेस्ट पोळीवर पसरवता येत नाही. आणि एकदा तांदूळपिठ घातले कि ते तूप गरमही करता येत नाही.

Related

गुलकंद बर्फी Gulkand Barfi

Gulkand Burfi in English वाढणी: साधारण १० ते १२ वड्या साहित्य: सव्वा कप खवा ( रिकोटा चिजपासून खवा) १/४ ते १/२ कप साखर ३ टेस्पून गुलकंद १ टिस्पून तूप कृती: १) रिकोटा चिजपासून खवा बनवण्याची कृ...

Gulkand Burfi

Gulkand Barfi in MarathiServings: Approx 12 piecesIngredients:1 1/4 cup Khoya, Crumbled (Khoya from Ricotta Cheese)1/4 to 1/2 cup Sugar3 tbsp Gulkand1 tsp Pure GheeMethod:1) How to make Khoya from Ric...

ओल्या नारळाच्या करंज्या - Karanji

Coconut Karanji in English वाढणी: साधारण ११ करंज्या वेळ: साधारण १ तास दिवाळीसाठी ड्रायफ्रुट बेक करंजी साहित्य: ::::सारण:::: सव्वा कप खोवलेला ओला नारळ पाउण कप किसलेला गूळ १/२ टिस्पून वेलची पूड ::::कर...

Newer Post Khaman Dhokla
Older Post Chirote

Post a Comment Default Comments

  1. Give us print option so that we can try.While reading it seems KHMANG Padarth for Diwali. But no use without copy, it cannot remember while making.

    ReplyDelete
  2. तांदुळ पीठी घातल्यावर तुप गरम का करता येत नाही?

    ReplyDelete
  3. Hi Asmita
    Tup garam kele tar Tandul pith garam tupat shijanyachi shakyata aste.. mhanun pithi ghatlyavar toop garam karun naye

    ReplyDelete
  4. हे साजूक तूप म्हणजे काय भानगड आहे ? आम्ही आमच्या घरी फक्त तूप हाच शब्द वापरतो.

    ReplyDelete
  5. तूपाला साजूक तूप का म्हणतात ते मलाही माहीत नाही पण आमच्या घरी आम्ही साजूक तूप असेच म्हणतो.
    तूपामध्ये दोन प्रकार असतात. वनस्पती तूप (डालडा) आणि गाई-म्हशीच्या दुधापासून बनलेले तूप, ज्याला साजूक तूपही म्हणतात. बहुदा यातील फरक दाखविण्यासाठी म्हणत असावेत.

    ReplyDelete
  6. chatakadar menu ahet ase padarth kahvun jibhevar chav rengalat rahte. mala beet juice chi recipes havya ahet.

    ReplyDelete
  7. Hi Vaidehi tai mala tujha Recipe Khupa avadlya Thanks.

    ReplyDelete
  8. very nice recipies.........saglya khup easy ani chaan ahet...

    ReplyDelete
  9. Me magchya diwali la tujhi recipe try keli hoti ani khup chan chirote jhale hote .. mhanun hya diwalila parat karnar ahe ! .. Thanks for the simple directions. Happy Diwali !

    Aparna

    ReplyDelete
  10. Tumchya saglya recipes khup chan astat .mahatvach mhanje saglya banvayla khup easy astat .tumchyadadun khup kahi shikayla milal.thanks, vaidehi tai.

    ReplyDelete
  11. Mi tuzi hi recipe try keli khup chan zali hoti

    ReplyDelete
  12. khup chhan disatahet Chirote..............Awadale

    ReplyDelete
  13. I followed your recepie of chirote.... I was successful in first attempt!!!!Thanks a lot!

    ReplyDelete
  14. Khoop chaan.simple recipe aahe.thx ya diwalit tumchya mule 1new padarth add honar.credit goes to u only.
    Thank you once again.

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item