टोमॅटोची कढी - Tomatochi Kadhi

Tomato Kadhi in English साहित्य: ५ मध्यम आकाराचे टोमॅटो २ टेस्पून चणा पिठ (बेसन) १/२ चमचा जीरेपूड १/२ कप ताक फोडणीसाठी  १ टीस्पून त...

Tomato Kadhi in English

tomato recipe, tomato curry, tomato saar, tomatochi kadhi, tomato kadhee
साहित्य:
५ मध्यम आकाराचे टोमॅटो
२ टेस्पून चणा पिठ (बेसन)
१/२ चमचा जीरेपूड
१/२ कप ताक

फोडणीसाठी
 १ टीस्पून तूप
 १/४ टिस्पून मोहोरी
१/४ टिस्पून जीरे
१/४ टिस्पून हिंग
१/२ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट
३-४ कढीपत्ता पाने

२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीपुरती साखर, मीठ

कृती:
१) टोमॅटो शिजवून घ्यावेत. साले काढून मिक्सरमध्ये प्युरी करावी, बिया काढून टाकण्यासाठी बारीक गाळण्यामध्ये गाळून घ्यावे.
२) चणा पिठ टोमॅटो प्युरीमध्ये गुठळ्या न होता मिक्स करावे. चवीपुरते मीठ आणि साखर घालावी, लाल तिखट घालावे. चवीसाठी जीरेपूड घालावी.
३) पातेल्यात तूप गरम करावे. मोहोरी, जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात बेसन घातलेली टोमॅटो प्युरी घालावी. चणा पिठ घातल्यामुळे कढीला घट्टपणा येतो. म्हणून गरजेनुसार ताक घालून घट्टपणा कमीजास्त करावा. मध्यम आचेवर कढी शिजू द्यावी.
४) सर्व्ह करताना कढीवर चिरलेली कोथिंबीर घालावी.

Related

Tomato 6944699343094100852

Post a Comment Default Comments

 1. phoTo tar surekh aahe, tujhaa blog chaan sajalaay , saglyaa padaarthanche phototaakatesmhanje greatch aahes ki!!

  ReplyDelete
 2. tujhaa blog chaane .!fakt padarthaabaddal lihite ki ajun kaahi?

  ReplyDelete
 3. Hi Vaidehi,
  Aaj try keli hi recipe ani mast zali.. thx

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item