नारळाचे सार - Naralche Sar
Naralache Sar in English साहित्य: १ कप नारळाचे दूध २ वाट्या आंबट ताक ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून कढीपत्ता १ चमचा तूप जीरे १ चम...


साहित्य:
१ कप नारळाचे दूध
२ वाट्या आंबट ताक
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
कढीपत्ता
१ चमचा तूप
जीरे
१ चमचा साखर
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
१) कढईत तूप गरम करून जीरे, मिरच्या, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी.
२) नंतर नारळाचे दूध घालावे. १ उकळी काढावी. ताक घालावे. ताक घातल्यावर उकळी येईस्तोवर ढवळावे.
३) उकळी आल्यावर चवीनुसार साखर आणि मिठ घालावे. कोथिंबीर घालावी.
चकली
khup chhan recipe aahe nehmichya kadhi pekshya vegali chav vatate ka?
ReplyDeleteNaralachya dudhamule chhan swad yeto ani khup ambat suddha lagat nahi.
ReplyDelete