व्हेज क्लब सॅंडविच - Club Sandwich

Club Sandwich in English वेळ: २५ मिनीटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: ६ ब्रेड स्लाईस १ मोठा टॉमेटो, स्लाईस करून १ मध्यम काकडी, सोलून स...

Club Sandwich in English

वेळ: २५ मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
६ ब्रेड स्लाईस
१ मोठा टॉमेटो, स्लाईस करून
१ मध्यम काकडी, सोलून स्लाईस करावेत
मीठ आणि मिरपूड
२ टेस्पून मेयॉनीज
::::व्हेज पॅटीसाठी::::
१/२ कप गाजराचे तुकडे
१/२ कप फरसबीचे तुकडे
१ मध्यम बटाटा
ब्रेड क्रम्ब्ज
१ टिस्पून बारीक चिरलेले आले-लसूण
१ टिस्पून तेल
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
२ चिमटी हळद
चवीनुसार मीठ
इतर साहित्य:
चीज स्लाईस किंवा किसलेले चीज
बटर किंवा लोणी

कृती:
१) गाजर आणि फरसबी वाफवून घ्याव्यात. सुरीने त्याचा खिमा करावा. कढईत तेल गरम करून त्यात आधी हळद आणि आलं-लसूण परतावे. नंतर कोथिंबीर घालावी. फरसबी आणि गाजराचा खिमा आणि बटाटा कुस्करून घालावा. मीठ घालून मिक्स करावे. दुसऱ्या वाडग्यात काढावे.
२) या मिश्रणात थोडे ब्रेडक्रम्ब्ज घालावे. मिक्स करून मध्यम आकाराच्या चपट्या पॅटी बनवाव्यात. ब्रेड क्रम्ब्ज मध्ये घोळवून तळून काढाव्यात.
३) ब्रेड स्लाईसना दोन्ही बाजूंना लोणी किंवा बटर लावून नॉनस्टीक तव्यावर मंद आचेवर टोस्ट करायला ठेवावे.
४) एका टोस्टवर थोडे बटर लावावे. त्यावर काकडी आणि टॉमेटो अरेंज करावे. वर मीठ मिरपूड पेरावी. त्यावर दुसरा ब्रेड टोस्ट ठेवावा. त्याला थोडे मेयॉनीज लावावे. वर तळलेली पॅटी ठेवावी. त्यावर चीज स्लाईस किंवा किसलेले चीज घालावे. वरून तिसरा ब्रेड स्लाईस ठेवून सॅंडविच तयार करावे. अशाप्रकारे दुसरे सॅंडविच तयार करावे.
टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह करावे.

टीप:
१) आवडत असल्यास थोडी मिरची कोथिंबीर चटणी लावली तरी चव छान लागते.

Related

Party 7375277897840392800

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item