मिंट कूलर - Mint Cooler

Mint Cooler in English साहित्य: १/४ कप पुदिन्याची पाने १/४ कप साखर १/४ कप पाणी थंडगार क्लब सोडा (कार्बोनेटेड वॉटर) कृती: १) पुदिन्...

Mint Cooler in English


साहित्य:
१/४ कप पुदिन्याची पाने
१/४ कप साखर
१/४ कप पाणी
थंडगार क्लब सोडा (कार्बोनेटेड वॉटर)

कृती:
१) पुदिन्याची पाने खलबत्त्याने कुटून घ्यावी. त्यात थोडे पाणी घालून कुस्करून घ्यावी. त्यातील रस वेगळा काढावा. पाने व्यवस्थित पिळून जास्तीतजास्त रस काढावा.
२) साखर आणि पाणी मिक्स करून २ मिनिटे उकळून त्याचा पाक बनवावा. पाक पूर्ण थंड होवू द्यावा.
४) पुदिन्याचे पाणी, साखरेचा पाक आणि क्लब सोडा एकत्र करून ग्लास मध्ये सर्व्ह करावा. सर्व्ह करण्यापूर्वी पुदिन्याच्या पाने सजवावे.

टीपा:
१) साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करावे.
२) नुसती साखरसुद्धा वापरू शकतो. पण पाक केल्याने चवीत बराच फरक पडतो.
३) आवडत असल्यास लिंबाचा थोडा रस किंवा आल्याचा आणि लिंबाचा मिळून असा रस वापरू शकतो.

Related

Party 5346806509961366265

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item