Sakharbhat

Sakharbhat in English वेळ: ४०-४५ मिनिटे वाढणी: ४-५ जणांसाठी साहित्य: २ वाट्या तांदूळ (सुवासिक) ३ ते साडेतीन वाट्या उकळते पाणी (महत्...

Sakharbhat in English

वेळ: ४०-४५ मिनिटे
वाढणी: ४-५ जणांसाठी

साहित्य:
२ वाट्या तांदूळ (सुवासिक)
३ ते साडेतीन वाट्या उकळते पाणी (महत्त्वाची टिप)
दोन वाट्या साखर
४-५ लवंगा
१ टिस्पून लिंबाचा रस
२ टेस्पून बेदाणे
२ टेस्पून काजू
२ चिमटी केशर
किंचित पिवळा रंग (ऐच्छिक)
१ टेस्पून तूप

कृती:
१) तांदूळ धुवून २० मिनिटे निथळत ठेवावे. तूप गरम करून त्यात लवंगा परताव्यात. नंतर तांदूळ घालून मध्यम आचेवर चांगले कोरडे होईस्तोवर परतावे.
२) तांदूळ चांगले परतले कि त्यात पाणी घालावे. किंचित पिवळा रंग घालू शकतो. भात मोकळा शिजवून घ्यावा. भात शिजला कि त्यात बेदाणे आणि काजू घालून हलकेच मिक्स करून घ्यावे. झाकून वाफ मुरू द्यावी. भात व्यवस्थित शिजला पाहिजे. जर थोडा जरी कच्चा राहिला तर साखर घातल्यावर आवठारतो आणि कडकडीत लागतो. शिजलेला भात परातीत मोकळा करावा. जरा निवू द्यावा.
३) साखर एका जाड बुडाच्या पातेल्यात घेउन ती बुडेल इतपत पाणी घालावे. केशर घालावे. गोळीबंद पाक करावा. पाक गरम असताना त्यात भात आणि लिंबाचा रस घालून कालथ्याच्या मागच्या टोकाने ढवळून मिक्स करावे. मंद आचेवर शिजू द्यावे. पाक मुरला (साधारण १२-१५ मिनिटे) कि आच बंद करावी. भात थोडा निवाला कि पाकाचा ओलेपणा कमी होतो.

टीपा:
१) तांदूळ नवीन असेल तर तांदुळाच्या दीडपट पाणी पुरते. पण तांदूळ जुना असेल तर दुप्पट किंवा अडीचपट पाणी घ्यावे.
२) कोणताही सुवासिक तांदूळ घ्यावा जसे सुरती कोलम, आंबेमोहोर इत्यादी. बासमतीसुद्धा वापरू शकतो पण या भातासाठी दिसायला लहान दाण्याचा तांदूळ छान वाटतो.
३) २ वाट्या तांदुळाला २ वाट्या साखर पुरेशी होते. पण बेताचे गोड होते. पक्का गोड भात हवा असेल तर अडीच वाट्या साखर घ्यावी.

Related

Sweet 2694123451367228471

Post a Comment Default Comments

  1. Hi vaidehi
    Sakhrechya pakka madhe bhaat kadak hot nahi na

    ReplyDelete
    Replies
    1. jar bhat fadfadit rahila kiva thoda jari kacchat rahila tar bhaat kadak hoto. Yasathi bhat purna mau shijla pahije.

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item