स्वीट कॉर्न बासुंदी - Corn Basundi

Sweet Corn Basundi in English वेळ: ३० मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: दिड कप स्वीट कॉर्न १ लिटर दूध १ टिस्पून तूप ३/४ कप साखर (...

Sweet Corn Basundi in English

वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी



साहित्य:
दिड कप स्वीट कॉर्न
१ लिटर दूध
१ टिस्पून तूप
३/४ कप साखर (किंवा आवडीनुसार)
१ चिमटी केशर
१/४ टिस्पून वेलची पुड
६-७ बदाम, ६-७ पिस्ते (४-५ तास भिजवून)

कृती:
१) भिजवलेले बदाम-पिस्ते सोलून त्यांच्या कापट्या कराव्यात. स्वीट कॉर्न कुकरमध्ये ३ शिट्या करून शिजवून घ्यावे. उकडलेल्या कॉर्नपैकी थोडे कॉर्न बाजूला काढावे आणि बाकीचे मिक्सरमध्ये वाटावे (एकदम बारीक पेस्टसुद्धा करू शकता किंवा किंचित भरड ठेवले तरी चालते.)
२) दूध पातेल्यात आटवण्यास ठेवावे. साय धरली कि चमचा फिरवावा.
३) दूध आटत असतानाच दुसऱ्या एका कढईत तूप गरम करून त्यात अख्खे कॉर्न आणि कॉर्नपेस्ट सुकेस्तोवर परतावी. किंचित गुलाबी होवू द्यावी.
४) दूध साधारण निम्मे होवू द्यावे. त्यात परतलेली पेस्ट, साखर, केशर, बदाम-पिस्त्याचे काप, आणि वेलचीपूड घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे उकळवावे.
५) बासुंदी रूम टेम्परेचरला आली कि फ्रीजमध्ये ठेवावी. गार सर्व्ह करावी.

टीप:
१)  बासुंदी गार केल्यावर दाट होते. त्यामुळे दूध आटवून १ लिटरचे अर्धा लिटर झाले कि आटवायचे थांबावे. जर रबडीसारखी एकदम घट्ट हवी असल्यास अजून आटवले तरी चालेल.

Related

Sweet 1198400535483431515

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item