शेपूची भाजी - Shepuchi Bhaji

Shepu Bhaji in English वेळ: १०-१५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: १ मोठी जुडी शेपू २-३ हिरव्या मिरच्या फोडणीसाठी: २ टिस्पून...

Shepu Bhaji in English

वेळ: १०-१५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी

साहित्य:
१ मोठी जुडी शेपू
२-३ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हळद, ५-६ मेथीदाणे
८-९ लसणीच्या पाकळ्या, ठेचून
१/४ कप भिजवलेले शेंगदाणे
२ टेस्पून भिजवलेली तूर डाळ
१/२ ते ३/४ कप थालीपीठाची भाजणी
२ टिस्पून गूळ (ऐच्छिक)
चवीपुरते मीठ

कृती:
१) शेपू निवडून घ्यावा. खोल भांड्यात पाणी घ्यावे व स्वच्छ करावा. नंतर चिरून घ्यावा.
२) कुकरच्या डब्यात शेपू व मिरच्या मोडून घालाव्यात. कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून भाजी शिजवावी. भाजीच्या डब्यावर झाकण ठेवून त्यावर भिजवलेले शेंगदाणे ठेवून तेही शिजवून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण घालावी. लालसर होईस्तोवर परतावे. मेथीदाणे घालून गुलाबी रंग येईस्तोवर परतावे. नंतर मोहोरी आणि हळद घालून फोडणी करावी.
४) फोडणीत भिजवलेली तूरडाळ घालून मंद आचेवर वाफ काढावी. डाळ अर्धवट शिजली कि शिजवलेले शेंगदाणे घालावेत. मिनिटभर परतावेत.
५) यात शिजवलेली शेपूची भाजी घालून नीट मिक्स करून घ्यावे. मंद आचेवर झाकण ठेवून मिनिटभर शिजवावे.
६) नंतर थालीपीठाची भाजणी पेरून मिक्स करावे. चवीनुसार मीठ आणि गुळ घालावा. झाकण ठेवून २ वाफा येउ द्याव्यात.
भाजी गरमच भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.

टीप:
१) भाजणीऐवजी ज्वारीचे पीठ किंवा भाजलेले बेसनही वापरू शकतो. भाजणीमुळे चव छान येते.

स्त्रोत: आमच्या साठे आज्जी.

Related

फोडणीची पोळी - Phodnichi Poli

Phodanichi Poli in English २ ते ३ जणांसाठी वेळ: १५ मिनीटे साहित्य: ७ ते ८ पोळ्या (आदल्या दिवशीच्या) फोडणीसाठी: २ टिस्पून तेल, चिमूटभर मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद, १/२ टि...

टोफू पराठा - Tofu Paratha

Tofu Paratha in English वेळ: पिठ मळण्यासाठी: १० मिनीटे । पराठे बनवण्यासाठी: १५ मिनीटे ६ ते ७ मोठे पराठे (१० इंच प्रत्येकी) साहित्य: १५० ग्राम टोफू (मी फर्म टोफू वापरला होता) (टीप १) १ गाजर, किसलेले ...

घडीच्या पोळ्या - Ghadichya Polya

Ghadichya Polya in English वेळ: १५ ते २० मिनीटे ५ ते ६ पोळ्या साहित्य: १ कप पिठाची मळलेली कणिक (५ ते ६ मध्यम गोळे) थोडे तेल १/२ कप कणकेचे कोरडे पिठ कृती: १) तवा गरम करण्यास ठेवावा. कणकेचा एक ग...

Post a Comment Default Comments

  1. Mast recepir ahai...aajach try karatai....Thanks.....
    .
    .


    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Hi tai
    Without shegdane nahi karta yenar ka hi bhaji

    ReplyDelete
  4. sorry this might be a stupid Q but tumhi shepu nivadta mhnaje kay discard karta? do you take only the tender leaves and throw away the rest?

    ReplyDelete
    Replies
    1. Ho pane ghyaychi.. jaad dethi astat tya takun dyaychya.

      Delete
  5. sorry this might be a stupid Q but tumhi shepu nivadta mhnaje kay discard karta? do you take only the tender leaves and throw away the rest?

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item