फिंगर चिप्सची भाजी - Finger Chips Bhaji
Finger Chips Sabzi in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ६ मध्यम बटाटे तळण्यासाठी तेल साधारण २ कप १ टिस्पून तूप फोडण...
https://chakali.blogspot.com/2013/06/finger-chips-bhaji.html
Finger Chips Sabzi in English
वेळ: २५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
६ मध्यम बटाटे
तळण्यासाठी तेल साधारण २ कप
१ टिस्पून तूप
फोडणीसाठी- १/४ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
२-३ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
८-१० कढीपत्ता पाने
१/४ कप ताजा खवलेला नारळ
१२-१५ काजू
चवीपुरते मिठ
कृती:
१) बटाटे सोलून घ्यावेत. सुरीने बटाट्याचे उभे बोटासारखे काप करावेत. तळणीत तेल गरम करून मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. तळलेले चिप्स पेपरवर काढून ठेवावेत. त्यावर थोडे मिठ भुरभुरावे.
२) दुसऱ्या कढईत तूप घेउन त्यात आधी काजू मंद आचेवर तळून घ्यावेत. तळलेले काजू बाजूला काढावेत. त्यातच जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता आणि मिरच्या घालून फोडणी करावी. मंद आचेवर १०-१५ सेकंद परतावे. तळलेले चिप्स, लागल्यास थोडे मिठ खवलेला नारळ आणि तळलेले काजू घालून मिक्स करावे. २ मिनिटे परतून सजावटीला थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी. लगेच सर्व्ह करावे.
टिप:
१) बटाटे तळायला आणि फोडणीला तूप वापरले तरी चालेल.

vaidehi tai i want a recipe for cooking without fire snacks
ReplyDelete