Raagi Flour Laddu in English
वेळ: ३० ते ३५ मिनिटे
१० मध्यम लाडू
दीड कप नाचणीचे पीठ
अर्धा ते पाउण कप साजूक तूप (वितळलेले)
१ कप पिठी साखर
१/२ कप जाडे पोहे
१/२ टीस्पून वेलची पूड
२ ते ३ टेस्पून सुकं खोबरं, किसून भाजलेले
३ टेस्पून दुध
२ टेस्पून बेदाणे, काजू तुकडा, बदामाचे काप
कृती:
१) तूप कढईत घेउन गरम होवू द्यावे. त्यात पोहे तळावेत. पोहे पटकन जळतात म्हणून फुलले की लगेच बाहेर काढावेत. याच तुपात नाचणीचे पीठ घालून मंद अच्वर भाजावे. साधारण १० ते १५ मिनिटे किंवा पीठ भाजल्याचा छान वास येईस्तोवर भाजावे. सतत ढवळत राहा. ढवळायचे थांबल्यास पीठ जळू शकते.
२) पीठ छान भाजले गेले की त्यात दुध घाला. दुध घातल्यावर पीठ फसफसेल. मग छान ढवळा. गॅस बंद करावा.
३) मिश्रण कोमट झाले की त्यात तळलेले पोहे, भाजलेले सुके खोबरे, वेलची पूड, पिठीसाखर आणि सुकामेवा घालून एकत्र करावे. नंतर लाडू बनवावे.
टीप:
१) पोहे तळायला खोलगट बारीक जाळी असलेला झारा घेतल्यास त्यात पोहे घालून नुसता गरम तुपात बुडवून पोहे तळावेत. ज्यामुळे पोहे बाहेर पडून जास्तवेळ तळल्याने जळणार नाहीत.



thanks for the recipe Vaidehi :)
Tumcha blog khup cchan ahe
Tumhi "baby food", "toddler food" jar tumachya blog madhe add kelet tar khup madat hoil
Dhanyavad
dhanyavad
lavkarach baby food section add karen.
Pohe kashasathi add kele?
talalelya pohyamule ladula chhan texture yete. Te optional ahet. vatlyas nuste nachaniche laduhi karu shakto.