Beetroot Vadi in English
वेळ: २० मिनिटे
वाढणी: ९ ते १० मध्यम वड्या
साहित्य:
१ कप उकडून किसलेला बीट
सव्वा कप साखर
१/२ कप खवलेला ताजा नारळ
१ टीस्पून वेलची पुड
२ टेस्पून तूप
१/२ टीस्पून लिंबाचा रस
कृती:
१) बीट प्रेशर कुकरमध्ये पाणी न घालता फक्त १ ते २ शिट्ट्या करून उकडून घ्यावा. गार झाल्यावर साल काढून टाकावे. मध्यम भोकाच्या किसणीवर किसून घ्यावे.
२) स्टीलच्या ताटाला मागच्या बाजूला तूप लावून ठेवावे. तसेच वड्या थापायला जाड प्लास्टिकचा कागद तूप लावून तयार ठेवावा.
३) पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात साखर, नारळ आणि किसलेले बीट एकत्र करून मिडीयम-हायच्या मध्ये गॅस ठेवावा.
४) सारखे ढवळत राहून आटवावे. मिश्रण आधी एकदम पातळ होईल मग हळूहळू घट्टसर होईल. संपूर्ण साधारण ७-८ मिनिटे लागतील. मिश्रण कालथ्याने पॅनच्या मध्यभागी जमा करून निरीक्षण करावे. जर मिश्रण पसरत नसेल तर लगेच गॅसवरून खाली उतरवावे. आणि ताटलीवर ओतावे. किंवा मिश्रणाचा छोटासा थेंब घेउन थोडा गार झाला की गोळा करून बघावा. जर तो कोरडा घट्ट झाला की मिश्रण तयार आहे असे समजावे.
५) मिश्रण तयार होत आले की लिंबाचा रस, वेलची पूड घालावी. मिश्रण ताटावर घालून थापावे. सुरीला तूप लावून सुरीने चौकोनी आकारात खुणा करून घ्याव्यात. मिश्रण सुकले की वड्या मोकळ्या कराव्यात.



wow!!!!!khupach chhan... Shweta
hi....
me hi recipe Kelli pn Bit ukdun n gheta kacchech kisun ghetale
Farach chan zale hote
thanx......for ur all recipes.
Hi Ketki,
Commentsathi dhanyavad.
kiti divas tiktat?
10-15 divas sahaj tikel
Mi try keli hi recipe khupach sopi ani khupach chavishta
khup khup dhanyavad
thanks