कॉर्न पकोडा - Corn Pakoda

Corn Pakoda in English वेळ: २० ते २५ मिनिटे वाढणी: ३ प्लेट साहित्य: दीड कप मक्याचे दाणे (महत्त्वाची टिप १ पहा) १/२ कप ज्वारीचे पीठ ...

Corn Pakoda in English

वेळ: २० ते २५ मिनिटे
वाढणी: ३ प्लेट
साहित्य:
दीड कप मक्याचे दाणे (महत्त्वाची टिप १ पहा)
१/२ कप ज्वारीचे पीठ
३ टेस्पून बेसन
२ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट (किंवा चवीनुसार)
१ टीस्पून जिरे
१/४ कप कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) मक्याचे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे.)
२) भरडलेल्या दाण्यात ज्वारीचे पीठ, मिरच्यांची पेस्ट, जिरे, बेसन, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे.
३) तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.

टीपा:
१) जर मक्याचे दाणे जून असतील तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२) इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) भजी तेलात सुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.

Related

Snack 7191178991544774017

Post a Comment Default Comments

  1. Chan ani simple recepe aahe , will try this sunday :)

    ReplyDelete
  2. मक्याचे दाणे किती वेळ वाफवावे?

    ReplyDelete
  3. मक्याचे दाणे कोवळे असतील तर वाफवायची गरज नाही. जून असतील तर कुकरमध्ये २ शिट्ट्या करून वाफवून घ्यावे.

    ReplyDelete
  4. Hi Vaidehi,

    can you please send corn cutlet recipie.

    ReplyDelete
  5. fakt besan pith nahi chalat...?

    ReplyDelete
  6. I will post corn cutlet.

    Ho Besan vaparle tari chalel..Dusri pithe jase jwari, soyabean ashi vaparli tari chaltil..

    ReplyDelete
  7. Mast idea ahe hi..corn che soup kase banvayche sangu shakal ka plz?

    ReplyDelete
  8. mugdalichi bhaji parat ekda post kara na karan ti link acess hota nahi ahe plz mala hawi ahe

    ReplyDelete
  9. hi vaudehi.
    ag khupp chan ahet blogs tuze. site visit kelyamule mala upvaaache padarth kalale. ata mi mazya husbund na navin recipi banun deu shakte.
    thanks a lot.
    shital

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item