चिली गार्लिक टोफू - Chili Garlic Tofu
Chili Garlic Tofu in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: ५ औंस फर्म टोफू (साधारण १०-१२ मध्यम तुकडे ) १ टेस्पून कॉर्न स्...
https://chakali.blogspot.com/2012/03/chili-garlic-tofu-schezwan-tofu.html
Chili Garlic Tofu in English
वेळ: २५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
५ औंस फर्म टोफू (साधारण १०-१२ मध्यम तुकडे )
१ टेस्पून कॉर्न स्टार्च
४ टीस्पून तेल
१ टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून आले पेस्ट
२ टीस्पून चिली गार्लिक पेस्ट
१/४ कप पाती कांद्याचा हिरवा भाग, बारीक चिरून
१/४ कप कांदा, मध्यम आकाराचे तुकडे (कांद्याच्या पाकळ्या विलग करा)
१/४ कप भोपळी मिरची, मध्यम तुकडे
१ टीस्पून सॉय सॉस
१/२ टीस्पून व्हिनेगर
चवीपुरते मीठ
कृती:
१) टोफू हलक्या हाताने प्रेस करून त्यातील थोडे पाणी काढून टाकावे. खूप जास्त प्रेस करू नये त्यामुळे टोफू कुस्करला जाउ शकतो. टोफूचे १ इंचाचे तुकडे करावेत. त्यावर कॉर्न स्टार्च भुरभुरावा. आणि हलकेच मिक्स करावे.
२) एक मध्यम पॅन घेउन त्यात १ टेस्पून तेल घालावे. त्यात टोफू शालो-फ्राय करून घ्यावा. सर्व बाजू थोड्या ब्राउन करून घ्यावात. शालो फ्राय करून झाले कि टोफू प्लेटमध्ये काढून ठेवावा.
३) त्याच पॅनमध्ये अजून १ टीस्पून तेल घालावे. त्यात आले लसूण पेस्ट परतावी. सॉय सॉस, भोपळी मिरची आणि कांदा घालून एक मिनिटभर परतावे. मीठ घालावे. कांदा आणि भोपळी मिरची क्रिस्पी राहिल्या पाहिजेत.
४) १ टीस्पून कॉर्न स्टार्च आणि ३ ते ४ टेस्पून पाणी घालून मिक्स करावे. हे मिश्रण पॅनमध्ये घालावे. चिली गार्लिक पेस्ट आणि व्हिनेगर घालावे. मिक्स करावे.
५) आता शालो फ्राय केलेला टोफू घालावा. हलकेच मिक्स करून मिनिटभर शिजवावे. प्लेटमध्ये सर्व्ह करावे. सर्व्ह करताना पाती कांद्याची चिरलेली पात घालून सजवावे.
टीपा:
१) वरील रेसिपी ड्राय टोफूची आहे. थोडी ग्रेव्ही हवी असेल १ टेस्पून कॉर्न स्टार्च १/२ कप पाण्यात घालून मिक्स करावे. आणि स्टेप ४ मध्ये चिली गार्लिक पेस्टसोबत हे मिश्रणही घालावे. बाकी सर्व कृती सेम. या ग्रेहीबरोबर थोडा पांढरा भातही सर्व्ह करू शकतो.
२) वरील रेसिपीसाठी "फर्म टोफू" च वापरावा. इतर टोफू एकदम मऊ असतात आणि फ्राय करता येत नाहीत.

very tempting...and nice option for paneer
ReplyDeleteaga kiti sundar disat ahe hi dish :) ekdum hotel sarkhi
ReplyDeleteme try karin udya. chilli garlic sauce naslyas kai vaprave?
-preeti
Hello preeti
ReplyDeleteCommentsathi dhanyavad
Tu shezwan sauce suddha vaparu shaktes. Ani chili garlic sauce ghari banavaycha asel tar lal mirchya (nehmichya fresh vaparavyat, sukya vaparu nayet) chamchabhar vinegar, lahan chamcha sakhar, mith, ani 5-6 lasun pakalya as miksarmadhye bark vatave. Ha sauce vaparava.
tempting...me kalcha try kele ahe recipe..khupcha mast lagte..tumcha blog kharcha chan ahe..pls mala khakarachi recipe sanga..
ReplyDeleteThanks Snehapriya,
ReplyDeletenakki post karen Khakrachi recipe
Hi Vaidehi,
ReplyDeleteAmhi kaalach hi recipe try keli. Majhakade tofu nhavta so I substituted big portabella mushrooms and water chestnuts. Khupach avadli amhaala hi recipe. Me hyacha barobar tujhe Hakka noodles va gobhi manchurian dry pan try kele. Sarvach khup tasty jhaale hote, thanks to you we enjoyed a homemade Indo-Chinese meal. Gobhi Manchurian madhye chote tukdey karaychi tip khup upyogi padli, aat paryanta shijle hote anhi ekdum crispy jhaale hote and sauce was just perfect!!! Thank a lot!!! :)
- Priti
Hello Priti
ReplyDeletecommentsathi thanks.. mushroom ani chestnut chi idea chan ahe..
ag te recipe magach kiti god decorate kel ahes!!!!
ReplyDeleteshweta
Thanks Shweta
ReplyDelete