बेक्ड कृटॉन्स (गार्लिक फ्लेवर्ड) - Garlic Croutons

Croutons in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ४ ते ५ सर्व्हिंग्स साहित्य: ४ ब्रेड स्लाईस २ टेस्पून ऑलिव्ह ऑइल २ ते ३ चिमटी मीठ १/२ टीस्...

Croutons in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ सर्व्हिंग्स

garlic croutons, Homemade croutons recipe, baked croutons, easy crouton recipeसाहित्य:
४ ब्रेड स्लाईस
२ टेस्पून ऑलिव्ह ऑइल
२ ते ३ चिमटी मीठ
१/२ टीस्पून लसूण पावडर (ऐच्छिक)
१/२ टीस्पून इटालियन हर्ब्ज (ड्राय)

कृती:
१) ब्रेड स्लाईसवर ऑलिव्ह ऑइल ब्रश करावे. प्रत्येक ब्रेड स्लाईसचे १२ लहान चौकोनी तुकडे करावे. जर मोठे कृटॉन्स हवे असतील तर ९ चौकोनी तुकडे करा.
२) ओव्हन ३०० F (१५० C) वर ७ मिनिटे प्रिहिट करावा.
३) ब्रेडचे तुकडे बेकिंग शीटवर पसरवावे. सिंगल लेयर करावा, तुकडे एकावर एक येऊ देवू नये. यावर इटालियन हर्ब्ज, लसूण पावडर आणि मीठ भूरभुरावे. ओव्हनमध्ये १५ मिनिटे बेक करावे. कृटॉन्स लाईट ब्राउन आणि आतपर्यंत कुरकुरीत होवू द्यावे. जर कृटॉन्स खालच्या बाजूला कुरकुरीत होत नसतील तर १० मिनिटानी कालथ्याने पलटावे आणि उरलेली ५ मिनिटे बेक करावे. कृटॉन्स ओव्हन बाहेर काढून गार होवू द्यावे.
कृटॉन्स सलाडमध्ये कुरकुरीतपणा आणण्यासाठी किंवा सुपबरोबर खायला छान लागतात.

टीपा:
१) कृटॉन्स पॅनमध्ये बनवू शकतो. कृतीतील पहिली स्टेप फॉलो करा. त्यानंतर त्यावर लसूण पावडर, मीठ आणि इटालियन हर्ब्ज भूरभूरावे. नॉनस्टिक तवा मंद आचेवर तापवून ब्रेडचे तुकडे कुरकुरीत होईस्तोवर परतावे. मध्येमध्ये कालथ्याने बाजू पलटावी.
२) ऑलिव्ह ऑईलऐवजी बटरसुद्धा वापरू शकतो.
३) जर इटालियन हर्ब्ज, लसूण पावडर नसेल तरी हरकत नाही. कृटॉन्स नुसते बटर आणि मीठ लावूनही चांगले लागतात.
४) तिखटपणासाठी रेड चिली फ्लेक्स घालून मग बेक करावे.

Related

Marathi 3854122055106781515

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item