गोटा भजी - Gota Bhaji Methi Gota
Gota Bhaji in English वेळ: २५ ते ३० मिनीटे साधारण १५-१८ मध्यम भजी साहित्य: १/२ कप बेसन (टिप १) १/२ कप मूगडाळ पीठ (टिप १) १/४ कप कसुरी...
https://chakali.blogspot.com/2012/01/gota-bhaji-methi-gota.html
Gota Bhaji in English
वेळ: २५ ते ३० मिनीटे
साधारण १५-१८ मध्यम भजी
साहित्य:
१/२ कप बेसन (टिप १)
१/२ कप मूगडाळ पीठ (टिप १)
१/४ कप कसुरी मेथी
१ टेस्पून लसूण पेस्ट
१/२ कप दही किंवा लागेल तेवढे
मसाले: २ लवंगा, २ चिमटी दालचिनी पावडर, १ टीस्पून अख्खे धणे, २ टीस्पून जिरे, ७-८ मिरी दाणे- सर्व कुटून भरडसर पावडर करावी.
२ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/४ टीस्पून हिंग
२ टीस्पून साखर
१/८ टीस्पून बेकिंग सोडा
चवीपुरते मीठ
गोटे तळण्यासाठी तेल
कृती:
१) एका खोलगट भांड्यात बेसन, मूगडाळ पीठ, कसुरी मेथी, लसूण पेस्ट, मसाला पावडर, लाल तिखट, हिंग, हळद, साखर आणि मीठ मिक्स करावे. यामध्ये दही घालून मिक्स करावे आणि दाटसर, चिकट असे पीठ भिजवावे. मिश्रणाचा कणकेसारखा गोळाही भिजला नाही पाहिजे आणि एकदम पातळही नाही असे पीठ भिजवावे. भजी करायच्या थोडा वेळ आधी सोडा घालून मिक्स करावे.
२) कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की गॅस मिडियम-हायच्यामध्ये ठेवावा. हाताला तेल लावून चमचाभर मिश्रण हातात घ्यावे त्याचा गोळा बनवावा आणि तेलात सोडावा. अशाप्रकारे सर्व गोटा भजी तळून घ्यावी.
भजी हिरवी किंवा चिंच चटणीबरोबर सर्व्ह करावी.
टिप्स:
१) बेसन आणि मूगडाळ यांचे रवाळ पीठ मिळाल्यास भाजी जास्त चांगली होईल.
२) जर मिश्रणाचा कणकेसारखा गोळा बनवून त्याची भजी केल्यास आतून गच्च आणि कच्ची राहते. आणि मिश्रण गरजेपेक्षा पातळ झाल्यास गोल गोटे बनत नाहीत. म्हणून मिश्रण चिकट्सर घट्ट बनवावे. आणि पीठ हाताळताना हातांना तेल लावावे. नाहीतर मिश्रण हातालाच चिकटेल.
३) कसुरी मेथीमुळे छान फ्लेवर येतो. पण आवडत असल्यास फ्रेश मेथीची पानेसुद्धा बारीक चिरून घालू शकतो.

mastttt!!!! :)
ReplyDelete