नूडल्स थीन सूप - Vegetable Noodles soup

Vegetable noodles soup in English ३ ते ४ जणांसाठी वेळ: २० मिनिटे साहित्य: २ ते ३ मश्रूम्स ३ टेस्पून गाजर, पातळ काप ३ टेस्पून भोपळी म...

Vegetable noodles soup in English

३ ते ४ जणांसाठी
वेळ: २० मिनिटे

noodles soup, vegetable noodles soup, vegetable thin soupसाहित्य:
२ ते ३ मश्रूम्स
३ टेस्पून गाजर, पातळ काप
३ टेस्पून भोपळी मिरची, पातळ काप
२ टेस्पून कोबी, एकदम बारीक चिरून
२ ते ३ बेबी कॉर्न, १ इंचाचे तुकडे
१ हिरवी मिरची, बारीक चिरून
दीड टीस्पून लसूण पेस्ट
१ टीस्पून तेल
४ कप व्हेजिटेबल स्टॉक
३० ग्राम नूडल्स
१/४ टीस्पून पांढरी मिरपूड
१ टीस्पून व्हिनेगर
१ पाती कांद्याची काडी, बारीक चिरून पांढरा आणि हिरवा भाग वेगवेगळा ठेवावा.
चवीपुरते मीठ

कृती:
१) पुरेसे पाणी उकळवून नूडल्स शिजवून घ्याव्यात. शिजवताना १ टीस्पून मीठ घालावे. नुद्लेस शिजल्यावर गार पाण्यात घालून ठेवाव्यात.
२) कढईत तेल घेऊन लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालावी. नंतर गाजर, भोपळी मिरची, कोबी, बेबी कॉर्न, मश्रुम्स आणि पाती कांद्याचा पांढरा भाग घालून एक दोन मिनिटे परतावे. नंतर व्हेजिटेबल स्टॉक घालून उकळी काढावी.
३) व्हेजिटेबल स्टॉक उकळायला लागला कि त्यात व्हिनेगर आणि चवीपुरते मीठ घालावे. १-२ मिनिटे उकळून नुडल्स घालाव्यात आणि अजून एक-दोन मिनिटे उकळी काढावी. मिरपूड घालून मिक्स करावे.
सर्व्हिंग बोलमध्ये वाढावे आणि पती कांद्याने सजवून सर्व्ह करावे.

टीप:
१) जर व्हेजिटेबल स्टॉक नसेल तर पाणी वापरले तरी चालेल. तसेच जर चिकन स्टॉक वापरायचा असेल तरीही आवडीनुसार वापरू शकतो.

Related

Winter 773437290445992047

Post a Comment Default Comments

  1. नमस्कार,
    सुंदर रिसिपिज आहेत! आपल्याशी संपर्क साधायचा होता पण आपला इमेल कोठे दिसत नाहिये म्हणून येथे ल्हित आहे.


    आपण आपला ब्लॉग मराठी कॉर्नशी देखिल जोडा. आपल्या ब्लॉगला प्रसिद्धी देण्याचे मोठे काम शक्य होईल. मराठी कॉर्नरवर आपल्या रिसिपिज आपल्याच नावे, छायाचित्रांसहित प्रसिद्ध केल्या जा्तील. अधीक माहितीसाठी,
    मराठी कॉर्नर:http://www.marathicorner.com/
    मराठी कॉर्नर सभासद ब्लॉगसूची:http://www.marathicorner.com/memberblogs/

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item