अळीव उष्ण असल्याने गरोदरपणात शक्यतो खाऊ नये.
वेळ: १० मिनीटे (अळीव भिजवलेले असतील तर)
वाढणी: १ ते दिड कप
१ कप दूध + अजून पाव कप दूध अळीव भिजवायला
१ ते दिड टेस्पून अळीव
३ ते ४ बदाम
१ खारीक (टीप २)
साखर चवीनुसार (साधारण दिड ते दोन टिस्पून)
चिमूटभर वेलचीपूड
कृती:
१) एका वाटीत अळीव पाव कप दुधात भिजत घालावेत (टीप ५). बदाम आणि खारीक दुसर्या वाटीत दुध किंवा पाण्यात भिजत घालावेत. (महत्त्वाची टिप १ पाहा). अळीव, खारीक आणि बदाम किमान ४ तास तरी भिजत ठेवावेत.
२) ४ ते ५ तासांनी अळीव चांगले फुलून येतील. तसेच खारीक बदामही चांगले भिजलेले असतील.
३) बदामाची साले काढून पातळ काप करावेत. खारकेची बी काढून खारकेचे बारीक तुकडे करावे.
४) दूध गरम करावे त्यात भिजवलेले अळीव घालावे. साखर, खारीक आणि बदाम घालून मध्यम आचेवर ३-४ मिनीटे शिजवावे. वेलचीपूड घालून ढवळावे आणि गरम गरम प्यावे.
टीप:
१) जर उन्हाळा असेल तर दुध फ्रिजबाहेर खराब होते. अशावेळी अळीव, खारीक आणि बदाम पाण्यात भिजवावेत.
२) जर खारकेचे तुकडे नको असतील तर खारकांची पूड करून ठेवावी. खीर करताना उकळत्या दुधात थोडावेळ शिजू द्यावी.
३) बदाम, खारीक भिजवलेले पाणी तसेच बदामाची साले पौष्टिक असतात. सोललेली बदामाची साले चावायला जरा चामट लागतात तरीही सालांमध्ये भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट असतात. तेव्हा पाणी आणि साले फेकून देऊ नयेत, खाऊन टाकावीत.
४) आवडीनुसार पिस्ता, काजू, बेदाणेसुद्धा खिरीत घालू शकतो.
५) अळीव भिजवताना चमच्याने निट ढवळावे. अळीव हलके असतात त्यामुळे ते पाण्यावर/ दुधावर तरंगतात आणि कधीकधी निट भिजत नाहीत.
Labels:
Lactation Boosting Recipes, Aliv kheer, Balantinicha ahar, post pregnancy recipes




चकलीताई, ही खीर एकदम मस्त होते...आताच केली आणि लापशी रवा सुद्धा...एकत्र कमेन्ट देतेय.....सध्या बाळंतपणामुळे असलं काही शोधतच होते...आणखी अशाच सोप्प्या रेसिपी असतील तर जरुर टाका...
धन्यवाद...
Hi अपर्णा
सर्वप्रथम तुझे अभिनंदन!! बाळाचं नावही छान ठेवलेयस :)
आणि कमेंटसाठी धन्यवाद ... अजून काही पोस्ट प्रेग्नंसी रेसिपीज पोस्ट करायचा प्रयत्न करेन.
Hi
Thank you so much for such beautiful and healthy recipes. Do you know what alive is called in English as i was trying to find it in indian store and couldn't find it here in US.
Hi Ask for "garden cress seeds"
Hi vaidehi..
thnx for d nice recipe... :)
thanks Neelima
thanks vaidu,hi khir khupch chan zali ani alivache ladu suddha ag pan mala non veg recepies hawyat tya kuthe miltil
Thanks Amrita,
Chakali blog var tula vegetarian recipes miltil karan me nonveg khat kinva banvat nahi