पोळीचा लाडू - Policha Ladu

Policha Ladu in English साधारण ४ ते ५ लाडू कृतीला लागणारा वेळ: ५ मिनीटे साहित्य: ४ ते ५ आदल्या दिवशीच्या पोळ्या २ टेस्पून किसलेला गूळ...

Policha Ladu in English

साधारण ४ ते ५ लाडू
कृतीला लागणारा वेळ: ५ मिनीटे

policha ladu, policha ladoo, chapathi laddu, chapati ladu, chapati ladoo, leftover chapati ladoo, shilya poliche laduसाहित्य:
४ ते ५ आदल्या दिवशीच्या पोळ्या
२ टेस्पून किसलेला गूळ, किंवा चवीनुसार
२ टेस्पून साजूक तूप

कृती:
१) पोळ्यांचा कुस्करा करून मिक्सरमध्ये भरडसर फिरवून घ्यावे.
२) त्यात गूळ आणि तूप घालून चांगले मळावे. गूळ, तूप आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली पोळी हे चांगले मिक्स झाले पाहिजे. या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळावेत.

टीप:
१) काहीजणांना पोळ्या मिक्सरमध्ये बारीक केलेल्या आवडत नाही. अशावेळी पोळीचा बारीक कुस्करा करून त्याचे लाडू बनवावेत.
२) या लाडूंमध्ये ड्रायफ्रुट्सची भरडसर पूड आवडत असल्यास घालू शकतो. तसेच शोभेकरता बेदाणेही लावू शकतो.

Another recipe from leftover Chapati - Quesadilla

Labels:
Policha Ladu, chapata ladu, leftover chapati ladu

Related

Marathi 216212374118391853

Post a Comment Default Comments

  1. hi!Mala mazya 1varshachya mulisathi recipe havi ahe.

    ReplyDelete
  2. Priy Vaidehi tai,

    Tumchya sarva pak-kruti khup chhan ahet. khup khup dhanyawaad! :)

    Snehal:)

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item