कोथिंबीर देठाची भजी - Kothimbir Bhajji

Cilantro stem's pakoda in English आपल्या जेवणात कोथिंबीर ही आवर्जून वापरली जाते. त्याची देठं आपण फेकून देतो. जर देठे कोवळी असतील तर या...

Cilantro stem's pakoda in English

आपल्या जेवणात कोथिंबीर ही आवर्जून वापरली जाते. त्याची देठं आपण फेकून देतो. जर देठे कोवळी असतील तर या देठांचा वापर करून मस्तपैकी भजी करता येतात. त्याचीच हि कृती:

Fritters, cilantro fritters, bhajji, pakoda recipe, pakora recipe, spicy pakoda recipe, Maharashtrian bhaji recipe, fried recipe, exotic spices, indian food recipe, mumbai food, appetizers, restaurant style snacksसाहित्य:
१ वाटी चिरलेली कोथिंबीरीची देठं
१ मध्यम कांदा
१/२ वाटी भिजवलेली चणाडाळ
१ चमचा भरून तांदूळपिठ
१ चमचा कणिक
५-६ हिरव्या मिरच्यांची पेस्ट
१ चमचा जिरं
मीठ
तळणीसाठी तेल

कृती:
१) १/२ वाटी चणाडाळ ४-५ तास भिजत घालावी. मिक्सरवर पाणी न घालता पेस्ट करावी.
२) कांदा बारीक चिरावा. एका वाडग्यात कोथिंबीरीची चिरलेली देठं, चिरलेला कांदा, चणाडाळ पेस्ट, चवीप्रमाणे हिरवी मिरची, तांदूळ पिठ, कणिक, जिरं आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. मिश्रण भज्यांची बोंडं तेलात सोडता येतील इतपत घट्ट ठेवावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाची बोंडं तळून घ्यावी. हि भजी चिंच गूळाच्या चटणीबरोबर किंवा हिरव्या झणझणीत चटणी बरोबर छान लागते.

टीप:
१) आवडत असल्यास यात लसूणसुध्दा वापरू शकतो.

Labels:
Cilantro Fritters, Indian Fritters Recipe, Pakoda Recipe, pakora recipe, Appetizer recipe

Related

Snack 9045638815889810246

Post a Comment Default Comments

  1. नविनच प्रकार वाचतोय

    ReplyDelete
  2. nice recipe....and never heard before

    ReplyDelete
  3. Hi This is very Nice recipe.Please send me Paneer Recipe I already req you before also please prepare recipe for the same .Shubhangi

    ReplyDelete
  4. मी तुमच्या कोथिंबीरीच्या देठाची आणि वांग्याची भजी , दोन्ही हि करुन पाहिले...अप्रतिम झाल्या २ नी हि ...
    २ ही प्रकार नवीन होते...माझ्या नवरयाला भरली वांगी, भरीत सोडले तर बाकीचे वांगी प्रकार् फरसे आवडत् नाहीत , पण भजी खुपच चविष्ट झाल्या होत्या...इतक्या कि खातना कुणी त्यात वांगी आहे असे म्न्हटले तरी पटण्यासारखे नव्हते...खुप च सही...
    तुमच्या सगळ्या च्् रेसेपीस छान आहेत...

    धन्यवाद नि शुभेच्छा सुध्दा....

    ReplyDelete
  5. NICE RECEIPE THAKS FOR ALL LOVELY RECEIPES

    ReplyDelete
  6. kothimbir vadichi recipe post karata yeyil ka?

    ReplyDelete
  7. Kothimbir vadichi receipd chan aahe mala dabelichi receipe send kara

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item