समोसा पफ - Samosa Puff

Samosa Puff In English साहित्य: रेफ्रिजरेटेड क्रेसेंट रोल्स ( Crescent Rolls ) (कुठल्याही सूपर मार्केटमध्ये रेफ्रिजरेटेड सेक्शनमध्ये म...

Samosa Puff In English


samosa crescent rolls, samosa puff, crescent puff, masala puff
साहित्य:
रेफ्रिजरेटेड क्रेसेंट रोल्स (Crescent Rolls)
(कुठल्याही सूपर मार्केटमध्ये रेफ्रिजरेटेड सेक्शनमध्ये मिळते.)
स्टफिंगसाठी:
२ शिजवलेले बटाटे
१ वाटी शिजवलेले हिरवे वाटाणे
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
१ चमचा गरम मसाला
१ लहान चमचा आमचूर पावडर
१ चमचा धनेपूड
१ चमचा बडीशेप
१-२ चमचे तेल
फोडेणीसाठी मोहोरी, जिरे, हळद, कढीपत्ता
मीठ



कृती:
आपण समोसे बनवताना जसे सारण बनवतो तसेच सारण बनवायचे आहे.
१) बटाटे सोलून व्यवस्थित कुस्करून घ्यायचे.
२) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, जिरे, हळद, कढीपत्ता, बडीशेप, मिरच्या घालाव्यात. वाटाणे घालून एक-दोन मिनीटे परतावे.
३) कुस्करलेले बटाटे घालावेत. गरम मसाला, धणेपूड, आमचूर पावडर आणि मिठ घालावे, व्यवस्थित मिक्स करावे.
४) क्रेसेंट रोल्सच्या "pipe shaped" पॅकमध्ये ८ त्रिकोणी चकत्या असतात. त्या अलगदपणे सेपरेट कराव्यात. त्यातील लहान बाजूवर १ ते दिड चमचा सारण ठेवावे. रोल करावा. चित्रात दाखवल्याप्रमाणे.
५) ओव्हन ३७० F वर प्रिहीट करावे. तयार केलेले रोल्स १५ -१८ मिनीटे बेक करावे.

टीप:
१) आपण आपल्या आवडीचे स्टफिंग बनवून व्हरायटी पफ बनवू शकतो.
२) तिखटपणा जास्त हवा असेल तर मिरचीचा ठेचा वापरावा.

Labels:
Samosa Puff, Samosa stuffing recipe, samosa recipe, spicy samosa recipe

Related

Snack 2025171474840709480

Post a Comment Default Comments

  1. Please show cover of the pack. we get lots of roll dough. I brought one but it didn't have seperate slices. i tried to prepare but failed to do.

    ReplyDelete
  2. Please show cover of the pack. we get lots of roll dough. I brought one but it didn't have seperate slices. i tried to prepare but failed to do.

    ReplyDelete
  3. निला

    अरेरे !! :( ...१-२ दिवसात मी त्या पाकिटाचा फोटो नक्की पोस्ट करेन.actually it is a pipe shaped packet. In that packet there are 2 big rolls. In each of them there are 4 triangles. u have to separate it very carefully..पण सध्या तुझ्याकडे जर ते पाकिट अजून असेल तर त्यातील dough परत rectangular shape मध्ये लाट आणि diagonally cut कर.

    ReplyDelete
  4. Hi Neela,

    Link dili ahe Pillsbury cover pack chi...tya pack varil phototil Crescent cha shape baghun thev..mhanje next time tasa gheta yeil...

    ReplyDelete
  5. Hi Vaidehi,

    Khup chan chan recepies post kelya baddal dhanyavad!
    Aaattaa chya aatta mi talatle ukad karun baghitle, khup chan zhale.
    Keep postind. Mi tuzya blog chi regular reader aahe.

    ReplyDelete
  6. Thank you very much for your comment..

    ReplyDelete
  7. Hi Vaidehi

    Khup chan, sopya ani mast recipes post kelyabaddhal Dhanyavad!!!

    Pls keep posting!! :)

    ReplyDelete
  8. hi viadehi
    mi he rolls walmart madhe shodhale pan nahi sapdale nakki kontya section madhe milatil please help
    pria

    ReplyDelete
  9. hi vaidehi tai
    mala he roll walmart madhe nahi sapdale nakki kontya section madhe milatil ]

    priya

    ReplyDelete
  10. He Roll refrigerated section madhye astat.. jar nahi milale tar tethil ekhadya karmacharyala gathun vichara.. mhanje vel vachel

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item