Chickpea Sandwich
Chickpea Sandwich in English वेळ: १५ ते २० मिनीटे वाढणी: ४ सॅंडविच साहित्य: ८ ब्रेडचे स्लाईस बटर १/२ कप मऊ शिजवलेले काबुली चणे १...

वेळ: १५ ते २० मिनीटे
वाढणी: ४ सॅंडविच
साहित्य:
८ ब्रेडचे स्लाईस
बटर
१/२ कप मऊ शिजवलेले काबुली चणे
१ टिस्पून लिंबाचा रस
थोडेसे मीठ आणि मिरपूड
पेस्टोसाठी:
१ कप कोथिंबीर
२ ते ४ हिरव्या मिरच्या
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
७-८ बदाम
३-४ लसूण पाकळ्या
२ टिस्पून लिंबाचा रस
चिमुटभर मिरपूड
चवीपुरते मीठ
इतर साहित्य:
किसलेले चीज
चिली फ्लेक्स
१ कांदा, पातळ गोल चकत्या
१ टॉमेटो, पातळ गोल चकत्या
कृती:
१) काबुली चणे मॅश करून घ्यावे. त्यात लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड घालून मिक्स करावे.
२) पेस्टोसाठी दिलेले साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. अगदी गरज लागली तरच थोडे पाणी घालावे. पेस्टो घट्टच असावा.
३) ४ ब्रेड स्लाईसना बटर लावून घ्यावे. त्यावर कांद्याच्या चकत्या ठेवाव्या. वर मॅश केलेले कबुली चणे पसरवावे. वर पेस्टो लावावा. टॉमेटोच्या चकत्या आणि त्यावर किसलेले चीज असे ठेवून वर ब्रेड स्लाईस ठेवावा. सॅंडविच तयार करावे.
हे सॅंडविच असेच खाता येते किंवा तव्यावर बटर घालून दोन्ही बाजू भाजून घ्यावे. यामुळे अजून छान चव येते.