चॉको सोया स्मूदी - Choco Soya Smoothie

Choco-Soya Smoothie in English वेळ: १० मिनीटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: दिड कप सोया मिल्क अर्धं केळं २ टिस्पून कोको पावडर १/४ टिस...

Choco-Soya Smoothie in English

वेळ: १० मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
दिड कप सोया मिल्क
अर्धं केळं
२ टिस्पून कोको पावडर
१/४ टिस्पून चॉकलेट इसेंस
साखरेचा पाक गरजेनुसार
गर्निशिंगसाठी - किसलेले चॉकलेट आणि थोडे क्रीम

कृती:
१) निम्मे सोया मिल्क आईस क्युब ट्रे मध्ये घालून गोठवून घ्यावे.
२) मिक्सरमध्ये सोय मिल्कचे क्युब, केळं, कोको पावडर, साखरेचा पाक, चॉकलेट इसेंस आणि सोय मिल्क असे सर्व मिश्रण छान घुसळून घ्यावे.
३) ग्लासमधे ओतावे. क्रीम आणि किसलेले चॉकलेट घालून सजावट करावे लगेच सर्व्ह करावे.

टीप:
१) कोको पावडरऐवजी चॉकलेट मेल्ट करून वापरण्यासही हरकत नाही. त्यावेळी शुगर सिरप कमी वापरावे.

Related

Soya 6557015287042233000

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item