चपाती शेजवान नुडल्स - Chapati Schezwan Noodles

Chapati Schezwan Noodles in English वेळ: १५ मिनीटे वाढणी: १ साहित्य: २ पोळ्या (चपात्या) नुडल्स तळायला तेल १ टेस्पून भरून शेजवान सॉस...

Chapati Schezwan Noodles in English

वेळ: १५ मिनीटे
वाढणी: १


साहित्य:
२ पोळ्या (चपात्या)
नुडल्स तळायला तेल
१ टेस्पून भरून शेजवान सॉस
१ टिस्पून तेल
१ टेस्पून आलं-लसूण बारीक चिरून
१ मिरची, बारीक चिरून
१/४ कप बारीक चिरलेला कांदा
१/४ कप सिमला मिरचीचे पातळ काप
१/४ कप गाजराचे पातळ काप
१/४ कप कोबीचे पातळ काप
१/२ टिस्पून सोया सॉस
१ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ कप पाणी
चिमुटभर मीठ
पाती कांद्याचा हिरवा भाग बारीक चिरून

कृती:
१) पोळ्या नुडल्ससारख्या पातळ आणि लांबट आकारात कापून घ्याव्यात.
२) तेल गरम करून पोळ्यांच्या नुडल्स कुरकुरीत तळून घ्याव्यात. टिश्यू पेपरवर काढून ठेवावे.
३) दुसऱ्या कढईत १/२ चमचा तेल गरम करून त्यात आलं-लसूण परतून घ्यावे. सोया सॉस,मिरची,कांदा, गाजर, शिमला मिरची आणि कोबी घालावा.
४) नंतर मैदा घालून मंद आचेवर काही सेकंद परतावे. शेजवान सॉस आणि थोडे पाणी घालून दाटसर सॉस बनवावा.
५) चव पाहून लागल्यास थोडे मीठ घालावे. तयार सॉसमध्ये तळलेल्या नूडल्स घालाव्यात. हलकेच मिक्स करून लगेच सर्व्ह करावे.

Related

Snack 8770477506077283700

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item