चायनीज कॉइन्स - Chinese Coins
Chinese Coins in English वेळ: २० मिनीटे ८ मध्यम कॉइन्स साहित्य: ८ ब्रेड स्लाईस १/२ कप गाजराचे बारीक पातळ काप (जुलिअन) १/२ कप फरसबी...

वेळ: २० मिनीटे
८ मध्यम कॉइन्स
साहित्य:
८ ब्रेड स्लाईस
१/२ कप गाजराचे बारीक पातळ काप (जुलिअन)
१/२ कप फरसबीचे पातळ तिरके काप
१/२ कप सिमला मिरची, बारीक चिरून
१/२ कप शिजलेल्या नुडल्स
दिड टिस्पून बारीक चिरलेले लसूण
अर्धा टिस्पून किसलेले आलं
१ टिस्पून तेल
१ टिस्पून सोया सॉस
चवीपुरते मीठ
थोडे बटर
शेजवान सॉस
कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात आलं आणि लसूण परतावे. नंतर गाजर, फरसबी, सिमला मिरची घालून मोठ्या आचेवर परतून घ्यावे.
२) अर्धा एक मिनिट परतल्यावर सोया सॉस आणि नुडल्स घालून मिक्स करावे. चवीपुरते मीठ घालून ढवळावे. तयार टॉपिंग बाजूला काढून ठेवावे.
३) ब्रेड स्लाईस गोल आकारात कापून घ्यावेत. त्यासाठी ब्रेड स्लाईसच्या आतील आकाराचा गोल डबा घेउन त्याने कट करावे.
४) कट केलेले ब्रेड स्लाईस तव्यावर मंद आचेवर बटरवर टोस्ट करावे.
५) टोस्टवर भाज्या आणि नुडल्सचे टॉपिंग ठेवावे. वरून तिखटपणासाठी थोडासा शेजवान सॉस घालावा.
लगेच सर्व्ह करावे.