उपवासाचे चाट - Upavasache Chaat

Upasache Chaat in English वेळ: २० मिनिटे वाढणी: २-३ जणांसाठी साहित्य: २ बटाटे १ मध्यम रताळे १ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे २ ते अडीच...

Upasache Chaat in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: २-३ जणांसाठी


साहित्य:
२ बटाटे
१ मध्यम रताळे
१ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे
२ ते अडीच वाट्या बटाट्याचा गोड चिवडा
१/२ वाटी तळलेले शेंगदाणे
१/२ वाटी हिरवी चटणी (फक्त कोथिंबीर, मिरची आणि मीठ)
१/२ वाटी चिंचगुळाची चटणी
काळं मीठ
साधं मीठ
दही
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल

कृती:
१) रताळे आणि बटाटा सोलून घ्यावा. मध्यम आकाराचे तुकडे करावे. तूप किंवा तेल गरम करून त्यात बटाटा, लाल भोपळा आणि रताळ्याच्या फोडी तळून घ्याव्यात.
२) लहान प्लेटमध्ये थोडे तळलेले तुकडे घालावे. त्यावर काळं मीठ, दही, हिरवी आणि चिंच गुळाची चटणी, तळलेले शेंगदाणे आणि बटाट्याचा चिवडा घालावा. वरून थोडी कोथिंबीर पेरावी. रंगसंगतीसाठी थोडेसे लाल तिखट भुरभुरावे.

Related

Snack 4139151882162707670

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item