तिळाचा भात - Tilacha Bhat

Sesame Rice in English वेळ: १० मिनिटे वाढणी: १ साहित्य: दिड कप शिजलेला भात (मोकळा) २ चमचे तीळ १ चमचा उडीद डाळ २ सुक्या लाल मिरच्...

Sesame Rice in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: १


साहित्य:
दिड कप शिजलेला भात (मोकळा)
२ चमचे तीळ
१ चमचा उडीद डाळ
२ सुक्या लाल मिरच्या
फोडणीसाठी: ३ चमचे तेल, २ चिमटी मोहोरी, १/४ चमचा हिंग
१ डहाळी कढीपत्ता
मुठभर शेंगदाणे
चवीपुरते मीठ

कृती:
१) तीळ भाजून घ्यावे. उडीद डाळ लालसर रंग येईस्तोवर कोरडी भाजावी. मिक्सरमध्ये आधी उडीद डाळ आणि मिरची बारीक करून घ्यावी. ती एका वाटीत काढावी. नंतर तिळाची बारीक पूड करावी.
२) कढईत तेल गरम करून आच बारीक करावी. त्यात शेंगदाणे खमंग तळून घ्यावे. त्यात मोहोरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. भात आणि मीठ घालून परतावे. नंतर तिळाची आणि उडीद डाळीची पूड घालावी. मिक्स करावे.
३) झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढावी.
हा भात गरमच खावा. खाताना तूप घालून खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतो.

Related

South Indian 7611902938875397399

Post a Comment Default Comments

 1. I tried it..it was yummy.

  ReplyDelete
 2. Fantastic recipe. I tried it, turned out really good!

  ReplyDelete
 3. आपण दिलेल्या पाकक्रिया करायला अतिशय सोप्या आणि कोणालाही जमण्यासारख्या असतात. तसेच त्या पौष्टीकही असतात. आणून ठेवलेल्या तिळाचे काय करायचे हा विचार करत होतो आणि हे पान सापडले. आपल्या ब्लॉगवर वाचून मी पालक सूप केले आणि फारच छान झाले होते.

  ReplyDelete
 4. अतिशय सुंदर पाककृती आहे, आम्ही करून पाहिला छान झाला होता. आवडला. धन्यवाद :)

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item