दहिवाली पनीर सब्झी - Dahiwale Paneer

Dahiwale Paneer Sabzi in English वेळ: ३०-३५ मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: २०० ग्राम पनीर २ लवंगा, २ मिरी दाणे, १ लहान दालीचीनी...

Dahiwale Paneer Sabzi in English

वेळ: ३०-३५ मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी


साहित्य:
२०० ग्राम पनीर
२ लवंगा, २ मिरी दाणे, १ लहान दालीचीनीचा तुकडा (किंवा ३ चिमटी दालचिनी पावडर)
१ मध्यम कांदा, बारीक चिरून (१/४ कपपेक्षा थोडा जास्त)
१ टिस्पून आलं
१ टिस्पून लसूण पेस्ट
१ कप टॉमेटो प्युरी (कच्च्या टॉमेटोची प्युरी)
६ टेस्पून काजूची पेस्ट (३ टेस्पून मगजबी + ३ टेस्पून काजू)
१/४ कप दही + १ टिस्पून गरम मसाला + १ टिस्पून आलेलसूण पेस्ट + १/४ टिस्पून चाट मसाला + दिड टिस्पून लाल तिखट
२ टेस्पून चिरलेली पुदिना पाने
२ टेस्पून मलई
४ ते ५ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ
१/२ टिस्पून साखर

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात अख्खे मसाले परतावे. त्यावर चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा परतला की आलेलसूण पेस्ट परतावी.
२) टॉमेटो प्युरी घालून त्याचा कच्चा वास जाईस्तोवर मंद आचेवर शिजू द्यावे (साधारण १० मिनिटे). काजू पेस्ट घालून ३-४ मिनिटे उकळवावे. अधून मधून तळापासून ढवळावे. पनीर घालावे.
३) आता दह्याचे मिश्रण आणि मीठ घालावे. मंद आचेवर २-४ मिनिटे शिजवावे. आता पुदिना पाने, मलई आणि साखर घालावी. झाकण ठेवून ८-१० मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
सर्व्ह करताना किसलेल्या पनीरने सजवावे आणि सर्व्ह करावे.

Related

Party 5580323853231016365

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item