चीज चेरी पाइनॅपल स्टिक्स - Cheese Cherry Pineapple Sticks
Cheese Cherry Pineapple on Stick in English वेळ: ५ मिनिटे १० पिसेस साहित्य: १० पाकवलेल्या चेरीज १० लहान चीज क्युब्ज १० अननसाचे मध्य...

वेळ: ५ मिनिटे
१० पिसेस
साहित्य:
१० पाकवलेल्या चेरीज
१० लहान चीज क्युब्ज
१० अननसाचे मध्यम चौकोनी तुकडे
टूथपिक्स
१ कप बर्फाचा चुरा (सजावटीसाठी) (ऐच्छिक)
कृती:
१) टूथपिकवर चेरी, चीजचा तुकडा आणि अननसाचा तुकडा असे ओवून घ्यावे. क्रम आवडीनुसार असावा.
२) सर्व्हिंग प्लेटमध्ये क्रश केलेला बर्फ घालून त्यावर तयार स्टिक्स ठेवाव्यात. लगेच सर्व करावे.
टीप:
१) फ्रेश चेरीज वापरून मी ही डिश ट्राय केळी. पण त्यातील बी काढताना चेरी अख्खी राहात नव्हती. म्हणून पाकवलेल्या चेरीज वापरल्या. यातील बिया काढून टाकलेल्या असतात आणि गोडपणासुद्धा छान असतो. त्यामुळे पाकवलेल्या चेरीज वापराव्यात.