कच्च्या फणसाचे कबाब

Jackfruit Kabab in English Time: 20 minutes Yield: 8 medium kabab साहित्य: १ कप कच्च्या फणसाचे तुकडे (शिजवून) १ टेस्पून हिरवी मिरची+...

Jackfruit Kabab in English

Time: 20 minutes
Yield: 8 medium kabab


साहित्य:
१ कप कच्च्या फणसाचे तुकडे (शिजवून)
१ टेस्पून हिरवी मिरची+आलं+कोथिंबीर ठेचा
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जीरेपूड
१/२ टिस्पून आमचूर पावडर
ज्वारीचे पीठ
२ पातीच्या कांद्याच्या काड्या, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
१/४ कप ब्रेड क्रम्ब्स
तळण्यासाठी तेल

कृती:
१) भाजीचा कच्चा फणस आणल्यास तो व्यवस्थित चिरावा. आधी २-३ वर्तमानपत्राचे कागद खाली पसरावे. त्यावर विळी ठेवावी. बाजूला थोडे वर्तमानपत्राचे तुकडे ठेवावे. दोन्ही हात आणि विळीचे पातं यांना तेल लावून घ्यावे. (फणस चिरला की त्यातून चिक बाहेर येतो आणि धुतला तरी कपड्यांवरचा डाग जात नाही. म्हणून गरज वाटल्यास आधीच एप्रन घालावे.)
२) फणस आडवा चिरावा. कागदाच्या तुकड्यांनी बाहेर पडलेला चिक पुसून टाकावा. चिरून मोठ्या फोडी कराव्यात.
३) मधला पांढरा दांडा काढून टाकावा. तसेच बाहेरील काटेरी साल विळीच्या सहाय्याने काढून टाकावे. लहान कुकर घ्यावा. फणसातील खाणेबल भाग काढून तो चिरावा. आणि सरळ मिठाच्या पाण्यात टाकावा. कुकरमध्ये ३ शिट्ट्या करून फणस शिजवून घ्यावा. यातील १ कप फणस वापरावा.
४) फणस कुस्करून घ्यावा. त्यात मिरची+आलं+कोथिंबीर ठेचा, धनेजीरेपूड, आमचूर पावडर, पातीचा कांदा, आणि मीठ घालून मिक्स करावे. त्यामध्ये मावेल इतके ज्वारीचे पीठ घालावे. ज्यामुळे घट्टसर गोळा होईल.
५) पीठाचे लिंबाएवढे गोळे करावे. १ सेंमी व्यासाची दांडी घ्यावी. त्याला तेल लावून घ्यावे. गोळा या दांडीवर चेपून २-३ इंचाचे कबाब बनवावे. अलगद हाताने दांडीवरील कबाब खेचून सोडवून घ्यावा. हलक्या हाताने ब्रेड क्रम्ब्जमध्ये घोळवून घ्यावा.
६) अशाप्रकारे सर्व कबाब बनवून घ्यावे. कढईत तेल गरम करून त्यात कबाब तळून घ्यावे.
टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह करावे.

Related

Snack 4226271642565430222

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item