धिरड्याचे पीठ - Dhiradyache Pith
Dhiradyache pith in English वेळ: ३५ ते ४० मिनिटे साहित्य: १/२ कप मटकी १/२ कप मुग १/२ कप मसूर डाळ १/२ कप काळे चणे १/४ कप चवळी १ ...
https://chakali.blogspot.com/2014/03/dhiradyache-pith.html?m=0
Dhiradyache pith in English
वेळ: ३५ ते ४० मिनिटे
साहित्य:
१/२ कप मटकी
१/२ कप मुग
१/२ कप मसूर डाळ
१/२ कप काळे चणे
१/४ कप चवळी
१ कप ज्वारी
३/४ कप तांदूळ
१/२ कप गहू
कृती:
१) सर्व साहित्य मंद आचेवर निरनिराळे भाजून घ्यावे. कोरडेच भाजावे (महत्त्वाची टीप २). खूप जास्त भाजू नये. प्रत्येक घटक ३ मिनिटे मध्यम आचेवर गरम करावा. परातीत काढून ठेवावे.
२) पूर्ण गार झाल्यावर गिरणीत दळून आणावे.
हे मिश्र धान्याचे पीठ धिरडी करण्यासाठी वापरावे.
टीपा:
१) साहित्य मायक्रोवेव्हमध्ये भाजले तरी चालते. प्रत्येक घटक निरनिराळा २ मिनिटे भाजावा.
२) साहित्य भाजले नाही तरी चालते. कच्चेच दळून आणले तरी हरकत नाही. पण मग टिकण्याची खात्री नाही. अळी वगैरे पडू शकते.

Hi Vaidehi , US madhe ghari he kase dalayche ? karan coffee grinder ne khup vel lagto ani farse barik pan nahi hote... thanku for all recipes ...
ReplyDeleteThank you soooooo much!! Mee gele kityek divas hee recipe shodhat hote. paN mala faar reliable source kadoon miLat nawhtee. paN tumchya blog var aahe mhaNje mee bindhast he peeth karoo shaknaar aata. You have no idea how many recipes from your blog I have tried! Almost 50%. And ALL turned out great.
ReplyDeleteYou are too good!!!
Vee Dee
Varil pitha madhe dhirde karte veli ajun konte masale takave asni pith kitivel bhijun thevave te plz sanga
ReplyDeletePith bhijavun thevaychi garaj nahi. lagech dhirde karayla ghetle tari chalel.
Deletedhirde vegvegalya paddhatine banavta yeil. yaat jire, hirvi mirchi paste, kothimbir, thechlele lasun, hing halad, mith ghalu shakto. palak methi yansarakhya bhajya barik chirun vaparu shakto.
Dhirde takamadhye bhijavlyas chav chhan ambatsar yete.