मेथी मकई पनीर - Methi Makai Paneer
Methi Makai Paneer in English वेळ: पूर्वतयारीस: ३० मिनिटे | पाकृसाठी: २० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: दीड कप मेथीची पाने ३/४ कप...

वेळ: पूर्वतयारीस: ३० मिनिटे | पाकृसाठी: २० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
दीड कप मेथीची पाने
३/४ कप स्वीट कॉर्न, उकडलेले
१०० ग्राम पनीर, १ इंचाचे तुकडे
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ मोठा टॉमेटो, प्युरी करून
२ टिस्पून लसूण पेस्ट
१ टिस्पून आले पेस्ट
३/४ कप ब्राउन ग्रेव्ही
२ टेस्पून काजू पेस्ट
दीड टिस्पून धणेपूड
अर्धा टिस्पून जिरेपूड
१ टिस्पून लाल तिखट
१ टिस्पून गरम मसाला
२ टेस्पून तूप किंवा बटर
२ टेस्पून क्रीम किंवा फेटलेली साय
चवीपुरते मीठ
कृती:
१) मेथीची पाने धुवून चिरून घ्यावी. मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालून त्यात १/२ चमचा मीठ आणि २-४ चमचे पाणी घालावे. झाकण ठेवून १ मिनिटभर मायक्रोवेव्ह मध्ये शिजवावे. थोडे थंड झाले की पाणी पिळून काढून टाकावे.
२) कढईत तूप गरम करावे. त्यात आलेलसूण पेस्ट परतावी. नंतर कांदा लालसर होईस्तोवर परतावा. टॉमेटोची प्युरी घालून मध्यम आचेवर परतावे. सतत ढवळावे.
३) त्यातील पाण्याचा अंश बऱ्यापैकी निघून गेला की त्यात मेथी आणि स्वीट कॉर्न घालावे. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
४) मेथी शिजली की ब्राऊन ग्रेव्ही, काजू पेस्ट आणि थोडे मीठ घालावे. मध्यम आचेवर शिजवावे. काजू पेस्ट तळाला चिकटते. म्हणून मधेमधे तळापासून ढवळावे.
५) काही मिनिटांनी थोडे पाणी, लाल तिखट, धने-जिरेपूड, आणि गरम मसाला घालावा. ढवळून पनीर घालावे.मध्यम आचेवर थोडावेळ शिजवावे. शेवटी क्रीम घालून मिक्स करावे आणि गरम सर्व्ह करावे.
टीप:
१) मेथी मिठाच्या पाण्यात मिनिटभर शिजवली की त्यातील कडवटपणा कमी होतो. पण काही जीवनसत्त्वांचाही नाश होतो. जर थोडी कडसर चव चालणार असेल तर त्यातील पाणी काढू नये.
Nutritional Info: (per serving) (Considering 3 Servings)
Calories: 561| Carbs: 30 g | Fat: 45 g | Protein: 13 g | Sat. Fat: 10 g | Sugar: 8 g
Hi Vaidehi,
ReplyDeleteThank you for your amazing recipes.
Recipes vachun swayampakacha huroop yeto.
Happy cooking,
Ketki Joshi-Parchure
Dhanyavad Ketki
Delete