अमेरिकन चॉपस्युई - American Chopsuey

American Chopsuey in English वेळ: पूर्वतयारी - २५ मिनिटे | कृतीसाठी - १० ते १५ मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ३०० ग्राम नुडल्स दीड...

American Chopsuey in English

वेळ: पूर्वतयारी - २५ मिनिटे | कृतीसाठी - १० ते १५ मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी

साहित्य:
३०० ग्राम नुडल्स
दीड कप तेल नुडल्स तळण्यासाठी
दीड टेस्पून लसूण, बारीक चिरून
एक टेस्पून आले, बारीक चिरून
१ मध्यम भोपळी मिरची, चौकोनी तुकडे
१ मध्यम कांदा, मध्यम चौकोनी तुकडे
४ मश्रुम्स, उभे चिरून
१ मध्यम गाजर, पातळ गोल चकत्या
४ चकत्या अननस, तुकडे करून
१०० ग्राम पनीर, मोठे तुकडे
२ पाती कांद्याच्या काड्या, बारीक चिरून
३ टेस्पून शेजवान सॉस
४-५ टेस्पून टॉमेटो केचप
१ टिस्पून सोया सॉस
१/४ टिस्पून मिरपूड
२ टिस्पून साखर
१ टेस्पून कॉर्न फ्लोअर
२ कप पाणी
चवीपुरते मिठ

कृती:
१) नुडल्स पाण्यात शिजवून घ्याव्यात. पाणी निथळून टाकावे. नुडल्स गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात.
२) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात आले लसूण परतावे. नंतर सर्व भाज्या घालून मोठ्या आचेवर १-२ मिनिटे परतावे.
३) भाज्या परतल्या की अननसाचे तुकडे, शेजवान सॉस, आणि टॉमेटो केचप घालून मिक्स करावे. १ वाटी पाण्यात कॉर्न स्टार्च मिक्स करून कढईत घालावे.
४) लागेल तेवढे पाणी घालून ग्रेव्हीला थोडासा दाटपणा येऊ द्यावा. पनीर, मिरपूड, चवीला थोडेसे मिठ आणि साखर घाला.
तळलेल्या नुडल्स सर्व्हिंग प्लेटमध्ये ठेवा. त्यावर गरम ग्रेव्ही घाला. लगेच सर्व्ह करा.

Related

Snack 2796437644845894562

Post a Comment Default Comments

  1. नूडल्स तळण्या विषयी जरा शंका आहे. पूर्ण एकदम कशा तळायच्या....? त्या जरा कट करुन सुट्या करुन घ्याव्या का? तळायच्या किती..लाल होईपर्यंत की कशा? आणि शिजवायच्या कितपत..? कच्च्याच तळल्या तर?
    फोटोत तर जस्ट तेलातून काढलेल्या दिसताहेत. आणि ज्या नेहमीच्या हाका नूडल्स साठी वापरतो त्याच नूडल्स वापरायच्यात नं? की या वेगळ्या असतात? मी इथे पुण्यात नवीनच लग्न झाल्याने स्वयंपाकघरात नवीन आहे!
    स्नेहा

    ReplyDelete
  2. हक्का नुडल्स वापरायच्या.
    नुडल्स नेहमीसारख्या शिजवायच्या. पाणी निथळून घ्यायचे नंतर तेलात तळायच्या. कट करायचे नाहीत. रंग बदलेस्तोवर तळू नये. कुरकुरीतपणा आला की बाहेर काढाव्यात.
    कच्च्या तळल्या तर कडकडीत होतील.

    ReplyDelete
  3. hi tar Chinese chopsui

    ReplyDelete
  4. blog renovation is going on from last 3, 4 years please take action, this blog is very nice, and don;t pull the blog towards negative SEO.
    also try for 300 x 600 adsense

    ReplyDelete
  5. Hi Anonymous,

    Blog Renovation has been going for 1 year. but it surely feels like long and I understand your sentiment.

    I am working towards completing changes to the design. And in design I'll consider seo.

    ReplyDelete
  6. hi.. sahityat corn flour lihlay.. bt kriti madhe corn starch lihlay.. nakki kai ghyaych??

    ReplyDelete
  7. Bharatat dukanat je Corn flour mhanun pandhare swachcha pith milte te mhanjech corn starch asato.

    Corn che yellow colorche pith aste te matra vaparu naye. Dukandarala 'makyache pith' dya ase vicharlet tar yellow color che pith detil. Je pith detil te adhi tapasun ghya. pandhare sarsarit maidyasarkhe pith milel te vapara.

    ReplyDelete
  8. kiti mast samjavlat tumhi.. thq so much.. bt Manchurian banvtana mi corn starch ghatal hot. bt te chikat jhalach nahi.. bhajya eka bajula n corn starch ch nahi pani eka bajula nighal hot.. nxt time banvtana kai badal karu??

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you..
      Corn starch la chikatpana nasato pan tyamule kurkurit pana changala yeto. pratyek goda banavtana nit dhavalun ghyayche ani mag telat sodayche.

      Delete

item