टॉमेटो जिंजर सूप - Tomato Ginger Soup

Tomato Ginger Soup in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ६ मोठे टॉमेटो १ टिस्पून आले, किसलेले १/४ टिस्पून लाल तिखट ...

Tomato Ginger Soup in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
६ मोठे टॉमेटो
१ टिस्पून आले, किसलेले
१/४ टिस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून सोया सॉस
१ टेस्पून पाइनॅपल क्रश
चवीपुरते मिठ
चवीपुरती साखर
१/२ चमचा लिंबू रस

कृती:
१) टॉमेटो उकडून घ्यावे. उकडलेले टॉमेटो, साधारण दीड कप पाणी, आले, लाल तिखट, अननस, मिठ, साखर आणि लिंबू रस एकत्र मिक्सरमध्ये बारीक वाटावे. गाळण्यातून गाळून घ्यावे.
२) पातेल्यात घालून एक उकळी काढावी. चव पाहून गरजेचे जिन्नस घालावे. सोया सॉस घालून सूप सर्व्ह करावे.

Related

Winter 2977199818172944123

Post a Comment Default Comments

  1. pineapple crush nasel tar chalel ka?

    ReplyDelete
    Replies
    1. Pineapple crush mule flavor changla yeto. nasalyas pinepapple che tukade vaparave. Tehi nastil tar thodi sakhar ghalavi.

      Delete

item