वॉनटॉन सूप - Wonton Soup

Wonton Soup in English वेळ: पूर्वतयारीसाठी - ३५ मिनिटे | सूपसाठी - १० मिनिटे वाढणी: ४ ते ५ जणांसाठी साहित्य: ::::सारण:::: १ मध्यम ग...

Wonton Soup in English

वेळ: पूर्वतयारीसाठी - ३५ मिनिटे | सूपसाठी - १० मिनिटे
वाढणी: ४ ते ५ जणांसाठी

साहित्य:
::::सारण::::
१ मध्यम गाजर
१ मध्यम भोपळी मिरची
३/४ कप कोबी, पातळ चिरून
५-६ फरसबी
३ मश्रुम्स
१/४ कप टोफू, छोटे तुकडे
२ पाती कांद्याच्या काड्या
२ हिरव्या मिरच्या
१ टेस्पून लसूण, बारीक चिरलेली
२ टिस्पून आले, बारीक चिरून
२ टिस्पून सोया सॉस
चवीपुरते मिठ
१ टेस्पून तेल
::::कव्हरसाठी::::
१ कप भरून मैदा
१/२ टिस्पून मिठ
::::सूपसाठी::::
६ ते ७ वाट्या व्हेजिटेबल स्टॉक
चवीपुरते मिठ
२-३ लसूण आणि १/४ टिस्पून आले ठेचून
१/२ टिस्पून व्हिनेगर

कृती:
१) सारणासाठी गाजर, भोपळी मिरची, कोबी, फरसबी, मश्रुम्स, टोफू, मिरची आणि पाती कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल गरम करावे. त्यात आले-लसूण परतावे. त्यात पातीकांदा परतावा.
२) नंतर सर्व भाज्या मोठ्या आचेवर एखाद मिनिट परताव्यात. सोया सॉस आणि मिठ घालावे. हे सारण वाडग्यात काढून ठेवावे.
३) मैदा, मिठ आणि पाणी एकत्र करून पीठ मळावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर मध्यम आकाराच्या द्राक्षाएवढे गोळे करावे (२ सेमी). कॉर्न फ्लोअर लावून पातळ लाटावेत.
४) लाटलेल्या पारीच्या मध्यभागी १ लहान चमचा सारण ठेवावे. अर्ध्या पारीच्या कडेला पाण्याचे बोट लावावे. करंजीसारखे दुमडून सील करावे. दोन कडा मागच्या बाजूने एकत्र जुळवाव्यात. अशाप्रकारे सर्व वॉनटॉन्स बनवून घ्यावे.
५) व्हेजिटेबल स्टॉकमध्ये मिठ आणि आलेलसूण घालून उकळत ठेवावे. उकळी फुटली की साधारण १५ ते १६ वॉनटॉन्स आत घालावे. ५ मिनिटे उकळू द्यावे म्हणजे वॉनटॉन्स शिजतील.
६) वॉनटॉन्स शिजले की वर तरंगतील. सूपमध्ये व्हिनेगर घालावे. प्रत्येक सर्व्हिंग बोलमध्ये ३-४ वॉनटॉन्स आणि स्टॉक घालावा. सूप लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) भाज्या शक्य तेवढ्या बारीक चिराव्यात. किसू नयेत. जाड भाज्यांमुळे वॉनटॉन्स फाटतात.
२) सारणामध्ये चिकनचे किंवा क्रॅबचे वाफवलेले तुकडे घालू शकतो.
३) वॉनटॉन्स बनवताना फाटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण सूपमध्ये उकळवताना सर्व सारण बाहेर पडते.

Related

Winter 4827458853965227817

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item