ड्रायफ्रुट पराठा - Dryfruit Paratha
Shahi Paratha in English वेळ: ३५ ते ४० मिनिटे वाढणी: ७-८ मध्यम पराठे साहित्य: १ कप मैदा २ टिस्पून तेल चिमूटभर मिठ दीड कप खजुराचे तु...
https://chakali.blogspot.com/2013/05/dryfruit-paratha.html
वेळ: ३५ ते ४० मिनिटे
वाढणी: ७-८ मध्यम पराठे
साहित्य:
१ कप मैदा
२ टिस्पून तेल
चिमूटभर मिठ
दीड कप खजुराचे तुकडे
१ कप काजू, बदाम, पिस्त्याची पावडर
१/२ कप पिठी साखर
पराठे भाजायला तूप
कृती:
१) कढईत खजुराचे तुकडे आणि तुकडे बुडेल इतपत पाणी घालून गॅसवर ठेवावे. मंद आचेवर वाफ काढावी. खजूराचा कडकपणा जाऊन मळता येईल इतपत मऊ झाले पाहिजे. लागल्यास अजून पाणी घाला.
२) खजूर आटवून घट्टसर करा. ताटलीत काढून गार होवू द्या. नंतर त्यात ड्रायफ्रुट्सची पावडर आणि पिठी साखर घालून कणकेसारखा मध्यम घट्ट गोळा बनवा. मळताना थोडेसे तूप घ्या.
३) मैदा, तेल आणि मिठ एकत्र करून पाण्याने पीठ भिजवून घ्या. १५ मिनिटे झाकून ठेवा.
४) भिजवलेल्या पीठाचे दीड इंचाचे गोळे करा. तेवढेच गोळे ड्रायफ्रुट्स आणि खजुराच्या मिश्रणाचे करा. मैद्याच्या गोळ्याची पारी करून मधोमध सारणाचा गोळा ठेवा. पारी बंद करा.
५) कोरडा मैदा घेउन पराठा लाटा. मध्यम आचेवर पराठा भाजा. भाजताना कडेने तूप सोडा.
टीप:
१) साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमीजास्त करावे.