भडंग - Bhadang
Bhadang in English वेळ: १५ ते २० मिनिटे ४ कप भडंग साहित्य: ४ कप भडंग चुरमुरे (भरीव) फोडणीसाठी: २ ते ३ टेस्पून तेल, १/२ टीस्पून हळ...
https://chakali.blogspot.com/2013/01/bhadang.html?m=1
वेळ: १५ ते २० मिनिटे
४ कप भडंग
साहित्य:
४ कप भडंग चुरमुरे (भरीव)
फोडणीसाठी: २ ते ३ टेस्पून तेल, १/२ टीस्पून हळद, १/२ टीस्पून लाल तिखट
२ कढीपत्ता डहाळी
३ टीस्पून मेतकुट + २ टीस्पून लाल तिखट
१/२ कप शेंगदाणे
१/२ टीस्पून आमचूर पावडर
चवीपुरते मीठ (साधारण १/२ टीस्पून)
चवीपुरती पिठीसाखर (१/२ टीस्पून)
कृती:
१) चुरमुरे पातेल्यात घालून कोरडेच परतून घ्यावे. मध्यम आचेवर परतावे. सारखे ढवळत राहावे. कधीकधी चुरमुरे चामट असतात, थोडे परतले कि चुरचुरीत होतात. परतलेले चुरमुरे परातीत काढून ठेवावे.
२) त्याच पातेल्यात तेल गरम करावे. आच एकदम मंद ठेवावी. यात शेंगदाणे तळून घ्यावे. थोडे लालसर झाले पाहिजेत नाहीतर आतमध्ये कच्चे राहतात. तळलेले शेंगदाणे चुरमुऱ्यावर घालावेत.
३) चुरमुरे आणि शेंगदाणे मिक्स करावेत. त्यातच मेतकुट आणि लाल तिखटाचे मिश्रण घालून हलक्या हाताने मिक्स करावे.
४) उरलेल्या तेलात फोडणी करावी. त्यात हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालावा. चुरमुरे फोडणीस घालावेत. झाऱ्याने मिक्स करावे. आमचूर पावडर चिमटी चिमटीने घालावी. चव पाहून लागल्यास अजून घालावी. तसेच मीठ आणि साखर घालावी. मंद आचेवर दोनेक मिनिटे मिक्स करावे.
भडंग गार झाले कि लगेच हवा बंद डब्यात भरून ठेवावे.
टिपा:
१) रंग अजून लाल हवा असल्यास साध्या लाल तिखटाबरोबर काश्मिरी लाल तिखट वापरावे.
२) यामध्ये आवडीनुसार चण्याचे डाळं, सुक्या खोबऱ्याचे कापटे तळून घालू शकतो.
३) लसूण फोडणीस टाकावी, व्यवस्थित तळून घ्यावी. यामुळे लसणीचा छान स्वाद येतो.
Nutritional Info: Per serving (considering total 10 servings)
Calories: 106| Carbs: 2 g | Fat: 8 g | Protein: 2 g | Sat. Fat: 1 g | Sugar: 1 g
Excellent...!!!
ReplyDeleteKhup sundar recepie ahe Sangalichya bhadangchi athavan ali
ReplyDeleteKhup sundar recepie ahe Sangalichya bhadangchi athavan ali
ReplyDeleteKhuppp mastttt recipe ahe...
ReplyDeleteThank you !!
Deletebhadang khup chhan zale perfect recipe
ReplyDeleteThanks Sneha
Deleteवैदेही मेतकूट फोडणीत घालायचे की हाताने mix करावे!?
ReplyDeleteUuupppss sorry gadabadit metakutachi step read keli geli nahi. :)
ReplyDelete४ कप म्हणजे नक्की किती ग्राम चिरमुरे घ्यायचे ?
ReplyDeleteसाधारण दीडशे ग्राम
DeleteThanks वैदेही,नक्की करेल मी आणि कसे झालेत ते पण सांगेल....
ReplyDelete