रगडा कचोरी चाट - Khasta Kachori Chat

Ragda Kachori in English वेळ: ४५ ते ५० मिनिटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: ::::सारणासाठी:::: ३/४ कप पांढरे वाटाणे १ टेस्पून तेल...

Ragda Kachori in English

वेळ: ४५ ते ५० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी

साहित्य:
::::सारणासाठी::::
३/४ कप पांढरे वाटाणे
१ टेस्पून तेल
१/२ टीस्पून बडीशेप
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
::::कव्हरसाठी::::
सव्वा कप मैदा
२ टेस्पून गरम तूप किंवा तेल
१/२ टीस्पून मीठ
::::इतर साहित्य::::
१/२ कप चिंचगुळाची चटणी
१/४ कप हिरवी तिखट चटणी
३/४ कप दही + २ टीस्पून साखर + १/२ टीस्पून मीठ
१/२ कप बारीक शेव
२ ते ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
२ टीस्पून चाट मसाला
थोडेसे लाल तिखट
कचोऱ्या तळायला तेल

कृती:
१) वाटाणे रात्रभर भिजवावेत (८ तास). भिजवलेले वाटाणे कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावेत. नंतर मॅश करावेत.
२) मैदा एका वाडग्यात घ्यावा. त्यात मीठ आणि गरम तूप घालावे. मिक्स करावे. पाणी घालून मध्यम मळून घ्यावे. झाकण ठेवून २० मिनिटे बाजूला ठेवावे.
३) कढईत तेल गरम करून त्यात हळद, लाल तिखट, आणि बडीशेप घालावी. ५-७ सेकंद परतून त्यात मॅश केलेले वाटाणे घालावे. त्यात धने-जिरेपूड घालावे. मिक्स करून ३-४ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढावी.
४) चव पाहून लागल्यास थोडे मीठ घालावे. मध्यम आचेवर मिश्रण सुकेस्तोवर परतावे. आच बंद करावी.
५) भिजवलेल्या मैद्याचे ६ ते ८ समान भाग करावे.
६) मैद्याचा एक भाग घेउन लाटावा. मध्यभागी १ चमचा सारण ठेवावे. पारीच्या बाजू एकवटून बंद करावे. थोडा कोरडा मैदा घेऊन जाडसर लाटावे.
७) कढईत तळणीसाठी तेल गरम करावे. तेल गरम झाले आच मध्यम ते मंदच्या मधे ठेवावी. कचोरी तेलात सोडून लालसर रंगावर तळून घ्यावी. दोन्ही बाजू छान  खुसखुशीत होईस्तोवर तळाव्यात.
८) तळलेली कचोरी प्लेटमध्ये काढून वरच्या बाजूला लहानसे भोक पाडावे. आत चिंचेची चटणी, हिरवी चटणी घालावी. त्यावर दही, चाट मसाला, लाल तिखट, शेव आणि कोथिंबीर आवडीनुसार भुरभुरावे.
लगेच सर्व्ह करावे.

Related

Snack 5936648808909236934

Post a Comment Default Comments

  1. Hi Vaidehi,
    Khup chhan RCP aahe... & mazi avadti aahe tyamule mi nakki karun pahin. pan kachori telat futnar tar nahi na?

    APARNA

    ReplyDelete
  2. Namaskar Aparna

    nahi futnar, fakt nit band karun ghe.

    ReplyDelete
  3. Chan Rcp, I make it at home, my children definitely like this. 1st time i use net for recipes.

    ReplyDelete
  4. simply delicious.thanks for sharing.

    ReplyDelete
  5. deliciousn n tempting .......as always thanks 4 sharing.

    ReplyDelete
  6. mast...:)...Thanks for sharing vaidehi..

    ReplyDelete


  7. tumhi recipe madhe dane n jiryachi pud vapartat.. ti kachya dane n jir chi pud ghalta ki bhajun gheta.. n tyachi pud karta..

    ReplyDelete
    Replies
    1. Dhane ani jire agadi halke garam karun ghyave. mhanje tyacha flavor uthun yeto ani mixer madhye barik patkan hote.

      Delete
  8. Thanks For Sharing Us a Wonderful and Tasty Delicious Dishes,keep sharing us.

    ReplyDelete

item