वडाभात - Nagpuri Vada Bhat

Nagpuri Vada Bhat in English   वेळ: ३० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: ::::वड्यांसाठी:::: (टीप १ नक्की वाचा) १/४ कप चणाडाळ २ ते ...


वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
::::वड्यांसाठी:::: (टीप १ नक्की वाचा)
१/४ कप चणाडाळ
२ ते ३ टेस्पून मटकीची डाळ किंवा अख्खी मटकी
२ टेस्पून उडीद डाळ
२ टेस्पून तूर डाळ
२ टेस्पून मसूर डाळ
२ टेस्पून मूग डाळ
७ ते ८ लसूण पाकळ्या
७ ते ८ हिरव्या मिरच्या
१/२ टीस्पून जिरे
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
तळणीसाठी १ ते दीड कप तेल (लहान आकाराची कढई घ्यावी)
::::भातासाठी::::
१ कप तांदूळ
दीड कप पाणी
१/२ टीस्पून मीठ
::::फोडणीसाठी:::: (टीप ५ पहा)
४ टेस्पून तेल
१/४ टीस्पून मोहोरी
१/४ टीस्पून हिंग
२ चिमटी हळद
४ ते ५ सुक्या लाल मिरच्या

कृती:
१) सर्व डाळी एकत्र करून किमान ३ तास कोमट पाण्यात भिजत घालाव्यात. चाळणीत काढून पाणी निथळून टाकावे. पाणी निथळून गेले कि भिजवलेल्या डाळी मिक्सरमध्ये घालाव्यात. त्यात जिरे, मिरच्या, लसूण पाकळ्या आणि मीठ घालून भरडसर वाटावे. वाटताना पाणी घालू नये.
२) तांदूळ धुवून त्यात दीड कप पाणी आणि थोडे मीठ घालावे आणि कुकरमध्ये फडफडीत भात शिजवावा.
३) तळणीसाठी तेल तापवावे. आच मध्यम करावी. वाटलेल्या मिश्रणात कोथिंबीर घालून मिक्स करावे. हातावर लहान लिंबाएवढा गोळा घ्यावा. अंगठ्याने दाबून चपटा करावा आणि तेलात सोडावा. अशाप्रकारे सर्व वडे तळून घ्यावे.
४) कढल्यात ४ टेस्पून तेल गरम करावे. तेल तापले कि आच मंद करावी किंवा बंद करावी. मोहोरी, हिंग, हळद आणि मोडलेल्या सुक्या मिरच्या घालून फोडणी करावी.
५) भात पानावर वाढावा. त्यावर २-३ वडे कुस्करून घालावे. आणि २ ते ३ चमचे फोडणी घालावी.
वडाभातासोबत कढी खूप छान लागते.

टीपा:
१) डाळींचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. जर मटकीची डाळ नसेल तार अख्खी मटकीसुद्धा वापरू शकतो. फक्त मटकी ५-६ तास भिजवावी.
२) मी मुगाची डाळ सालीसकट वापरली होती.
३) काहीजण मटकीची डाळ जास्त घेउन उरलेल्या डाळी कमी घेतात. तसे केले तरीही चालेल.
४) डाळी धुवून वाळवून त्याचे भरडसर पीठ काढावे. या पिठाला थोडे गरम तेलाचे मोहन घालून भिजवावे. आणि चपटे वडे तळले तरीही चालते, वडे जास्त खुसखुशीत होतात.
५) वडे तळून झाले कि उरलेल्या तेलातील ४ टेस्पून तेल लहान कढल्यात काढावे आणि त्याचीच फोडणी करावी. म्हणजे ताजे तेल काढायची गरज नाही.

Nutritional Info: Per Serving (Total 3 servings)
Calories: 567 | Carbs: 67 g | Fat: 29 g | Protein: 10 g | Sat. Fat: 2 g | Sugar: 1 g 

Related

Rice 7964731882633760061
Newer Post Vada Bhat

Post a Comment Default Comments

  1. waah! me nakki karun baghen! dhanyawaad!

    ReplyDelete
  2. hi, mala tumchya receipes khup awadtat. diwalicha sarv faral mi tumchya wachunch kela. thanx

    ReplyDelete
  3. Hi vaidehi
    can you post veg risotto recepi if you have tried it.

    ReplyDelete
  4. Thank you! Mi Nagpur chi aahe. Tuze tips khup Chan astha! Good luck!

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Like Chakali!

item