मिल्क पावडर पेढे - Milk Powder Peda

Milk Powder Peda in English वेळ: १५ मिनिटे २० लहान पेढे साहित्य: १ कप मिल्क पावडर १/२ कप कंडेन्स मिल्क २ टीस्पून साजूक तूप १/२ ...


वेळ: १५ मिनिटे
२० लहान पेढे

साहित्य:
१ कप मिल्क पावडर
१/२ कप कंडेन्स मिल्क
२ टीस्पून साजूक तूप
१/२ टीस्पून वेलची पूड

कृती:
१) मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क आणि तूप एकत्र एका मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात घालावे. ३० सेकंद मायक्रोवेव्ह करावे. भांडे बाहेर काढून मिनिटभर ढवळावे. नंतर १ मिनिट मायक्रोवेव्ह करावे.
२) भांडे बाहेर काढावे. मिनिटभर ढवळावे. परत ३०-३० सेकंद २ वेळा मायक्रोवेव्ह करावे. प्रत्येक वेळी भांडे बाहेर काढून ढवळावे.
३) मिश्रण घट्टसर झाले पाहिजे. जर अजून मिश्रण घट्ट झाले नसेल तर ३० सेकंद अजून मायक्रोवेव्ह करावे.
 वेलचीपूड घालून मिक्स करावे.
४) मिश्रण थोडे गार होवू द्यावे. एकदा मिश्रण हाताळण्यायोग्य झाले कि पेढे बनवा.

टीपा:
१) हे पेढे सुरुवातीला थोडे चिवट होतात. दुसऱ्या दिवशी खुटखुटीत होतात. वाटल्यास वरील प्रमाणाच्या निम्मे प्रमाण घेउन ट्राय करून पहावे.
२) खवा नसल्यास मिल्क पावडरचे पेढे हा चांगला पर्याय आहे.
३) यामध्ये आवडीनुसार बटरस्कॉच, वेनिला, केशर यांचे इसेंस घालू शकतो.
४) १/२ कप मिल्क पावडर कमी करून त्याऐवजी १/२ कप काजू पावडर, किंवा १/२ कप बदाम पावडर घालावी.

Related

Sweet 5985251572984180557

Post a Comment Default Comments

  1. how to prepare it on gas stove?

    ReplyDelete
  2. gas stove var me he pedhe kadhi kele nahiyet. Karan milk powder ani condensed milk thodi jast heat lagli tar jalte.
    Tumhala try karun pahayche asalyas sarv misrhan ekatra karoon mand achevar nonstick pan madhye shijavave. tyat thode dudh ghalave mhanje mishran olsar rahil. mishran datsar zale ki pedhe banavave.

    ReplyDelete
  3. mi ya varshi ganapatila milk powder che modak kele. khup ch chan zalele, saglyana aavadale dekhil. mi gas stove var karun pahile. sananchya divasat bajarat milanara bhesalyukt mawa & mithai yache dushparinam aapan aikato & news madhe pahto dekhil. tyalach gharchya ghari milk powder che modak ha paryay farch uttam aahe. Thank u :) . ashach chan chan receipe post karat raha. aani aamhi try karun baghu.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item