मुळ्याचे पराठे - Muli Paratha

Muli Paratha in English वेळ: ३५ ते ४० मिनिटे ५ ते ६ मध्यम पराठे साहित्य: सारण::: १ मोठा पांढरा मुळा, किसलेला १ टीस्पून धणेपूड १/२...


वेळ: ३५ ते ४० मिनिटे
५ ते ६ मध्यम पराठे
साहित्य:
सारण:::
१ मोठा पांढरा मुळा, किसलेला
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
१/२ टीस्पून हिरवी मिरची पेस्ट
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरलेली
१/४ टीस्पून ओवा
चवीपुरते मीठ
आवरणाची कणिक:::
१ कप गव्हाचे पीठ (कणिक)
२ टीस्पून तेल
१ मध्यम बटाटा, उकडून सोललेला
१/२ टीस्पून जिरे
१/४ टीस्पून हळद
१/२ टीस्पून मीठ
इतर साहित्य:
तेल किंवा बटर पराठे भाजताना

कृती:
१) कणिक बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, उकडलेला बटाटा, तेल जिरे, हळद आणि मीठ घालावे. थोडे पाणी घालून मध्यमसर कणिक माळून घ्यावी. १५ मिनिटे झाकून ठेवावी.
२) तोवर पराठ्याचे सारण बनवावे. किसलेला मुळा एका बोलमध्ये घ्यावा. त्यात थोडे मीठ घालून मिक्स करावे. १५ मिनिटात मिठामुळे मुळ्यातील पाणी बाहेर येईल. हे पाणी पिळून बाहेर काढावे. पिळलेला मुळा दुसऱ्या बोलमध्ये घ्यावा. त्यात धने-जिरेपूड, मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, ओवा, आणि चवीपुरते मीठ घालून मिक्स करावे.
३) तवा मध्यम आचेवर गरम करत ठेवावा. तोवर कणकेचे आणि सारणाचे ५ किंवा ६ मध्यम आकाराचे सारखे भाग करावे.
४) कोरडे पीठ घेउन कणकेचा एक भाग ३ इंच गोल लाटावा. सारणाचा एक भाग मध्यभागी ठेवावा. कडा सर्व बाजूंनी एकत्र करून सील करावे. कोरडे पीठ घेउन पराठा लाटावा. लाटणे हलक्या हाताने फिरवावे म्हणजे पराठा फाटणार नाही.
५) गरम तव्यावर मिडीयम-हाय आचेवर दोन्ही बाजूंनी पराठा भाजून घ्यावा. भाजताना चमचाभर तेल सोडावे.
गरम पराठा रायते, लोणचे, दही किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.

टीपा:
१) मुळ्याला पाणी सुटले कि पराठा लाटता येत नाही, ठिकठिकाणी फाटतो. म्हणून सारण बनवले कि लगेच पराठे बनवायला घ्यावेत, म्हणजे सारण जास्त ओलसर होणार नाही.
२) पराठे लाटताना लागेल तसे कोरडे पीठ घ्यावे, ज्यामुळे पराठा पोळपाटाला चिकटणार नाही.

Related

Snack 3258030982662420663

Post a Comment Default Comments

  1. hi vaidehi, mulyache parathe mi last time kele hote tenva te mala jamle navte. ya weli mi tuzya padhtine karun pahin. jamle tar nakki kalwen. ani mala ek wicharaych hot ki tu nonveg recipes nahi ka karat?

    ReplyDelete
  2. नमस्कार हर्षदा,
    कमेंट पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. मला नक्की कळव पराठे कसे झाले ते.
    मी शाकाहारी आहे. त्यामुळे नॉनव्हेज रेसिपी पोस्ट करत नाही.

    ReplyDelete
  3. हाय वैदेही,
    यापेक्षा मुळ्याचे पराठे साधे पीठात खीस मिक्स करुनच अधिक चांगले लागतील असे वाटते. आणि मिश्र पीठे (जसे ज्वारी, कणीक, बेसन, तांदळाचे पीठ) घेतल्यास अधिक चांगले. मुळ्याच्या कीसाला सुटलेल्या पाण्यातच पीठ भिजवावे...अगदीच गरज पडल्यास वरुन थोडेसे पाणी घ्यावे. जरा चरमरीत तिखट-मीठ-ओवा-तीळ टाकावे व तेलाचा एक चमचा जास्त सढळपणे सोडावा.

    ReplyDelete
  4. Hi Vaidehi
    Mulyache Parathe receipe khup chan ahe.
    Nehami lagnare dhanepud, jirepud, chat masala, etc ghari banavun theu shakato ka? ani te kase banawave?

    ReplyDelete
  5. नमस्कार आंबट गोड
    तशाही प्रकारे परोठा छान लागेल.

    ReplyDelete
  6. धनेजीरे पूड चाट मसाला अशा रेसिपीसुद्धा मी नक्की पोस्ट करेन.

    ReplyDelete
  7. Hiii vaidehi,,, mala sarso ka saag chi recipe havi ahe.. pls tumhi post Karal Kay??

    ReplyDelete
  8. kankechya avaranasathi BATATA ka ghalayacha? me ajun tuzi he receipe try keli nahi.........pan CHAKALICHI barich MADAT hote .......THANK YOU......


    Sampada S.Mahale

    ReplyDelete
  9. batata ghalun kanik khup vel malun ghyavi lagel ka?


    Sampada S. Mahale

    ReplyDelete
  10. Hi Sampada

    commentsathi thanks
    Batata nahi ghatla tari chalel. batatyamule baherche cover mausut rahte. ani chav suddha changali lagte.

    ReplyDelete
  11. Batata ghatlyane kahi vegle karayla nako. nehmi sarkhech pith malave.

    ReplyDelete
  12. pl reset printing setting. not print properly

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item