How to roast an Eggplant

i) over stove top :- If you have gas burner, rub little oil to eggplant and roast it on the flame. Turn it occasionally. (Note- Eggplant rel...

i) over stove top:- If you have gas burner, rub little oil to eggplant and roast it on the flame. Turn it occasionally. (Note- Eggplant releases water after roasting, so it may leave stains on the burner. But those stains can be removed by scrubbing)

ii) in the Oven:- Preheat the oven at 450 F. Apply some oil all over the eggplant. Poke the eggplant a few times with a fork. Wrap it with aluminum foil. Put it in a baking tray and bake for 45 to 50 minutes. (It does cook the eggplant, but does not give smokey flavor)

iii) Use the barbecue grill to roast eggplant.

iv) in Fireplace (Tip) - Funny to hear but I actually roasted the eggplant in fireplace :). Apply some oil all over the eggplant. Poke the eggplant a few times with a fork. Wrap it with aluminum foil. Open the exhaust before starting fire. Now stack 2-3 logs in fireplace. Put 1 or 2 coconut shells at the bottom. Sprinkle 2 spoons oil over the logs. Place the eggplant in between so that it gets roasted evenly. Light the fire with some newspapers. After fire kicks up perfectly, eggplant will get roasted within 10 to 15 minutes. Remove the eggplant very carefully by using tong. BE CAREFUL WHILE USING THIS METHOD and taking the roasted eggplant out.

Tip:
1) I did not use 'starter fire logs' which are available in super markets, as I wasn't sure of what things and chemicals have been used to make them workable. It is better to use naturally fallen twigs.

Related Recipes
Baingan Bhurta
Baingan Bhurta in Yogurt
Tamarind flavored Baingan Bhurta

======================================================

i) गॅसवर: गॅसच्या शेगडीवर वांगं भाजण्यासाठी आधी वांग्याला किंचीत तेल चोळून घ्यावे आणि मध्यम किवा मोठ्या आचेवर भाजावे. मधेमधे वांगं फिरवावे म्हणजे सर्व ठिकाणी वांगं निट भाजले जाईल. (नोट- गॅसवर वांगं भाजताना वांग्यातील पाणी शेगडीवर पडून डाग पडतात. पण थोडे घासून स्वच्छ करता येते.)
ii) ओव्हनमध्ये: ओव्हन ४५० F वर प्रिहीट करावे. वांग्याला बाहेरून तेल लावून सुरीने किंवा काट्याने (Fork) काहीवेळा टोचावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये गुंडाळून ४५ ते ५० मिनीटे बेक करावे. (या पद्धतीने वांग्याचा आतील गर शिजतो पण थेट विस्तवावर भाजल्याने जो खमंग स्वाद येतो तो मात्र येत नाही.)

iii) बार्बेक्यु ग्रिलसुद्धा वांगं भाजायला वापरू शकतो.

iv) फायरप्लेस (टीप): ऐकायला मजेशीर वाटेल पण मी वांगं फायरप्लेसमध्ये भाजलं. वांग्याला तेल लावून काहीवेळा सुरीने किंवा काट्याने टोचून घ्यावे. अल्युमिनीयम फॉइलमध्ये व्यवस्थित घट्ट गुंडाळून घ्यावे. फायरप्लेसमध्ये वरच्या बाजूस धूर बाहेर जाण्यासाठी छोटी खिडकी असते ती प्रथम उघडावी. नंतर २ ते ३ जाडसर फांद्या फायरप्लेसमध्ये रचाव्यात. खाली १-२ नारळाच्या करवंट्या ठेवाव्यात. १-२ चमचे तेल फांद्यांवर शिंपडावे. जागा करून मधल्या जागी वांगं ठेवावे. आग पेटवावी. लागल्यास पेपर किंवा कार्डबोर्डचे तुकडे वापरून आग सुरू करावी. शेकोटी व्यवस्थित पेटल्यावर १० ते १५ मिनीटात वांग भाजलं जातं. वांगं भाजलं गेल्यावर अगदी सांभाळून पापड तळायच्या चिमट्याने बाहेर काढावे.

टीप:
१) वांगं भाजण्यासाठी बाजारात जो फायर स्टार्टर लॉग मिळतो तो वापरला नव्हता कारण तो बनवण्यासाठी कोणत्या गोष्टी किंवा रसायनं वापरतात ते माहीत नसतं. म्हणून झाडाच्या तुटलेल्या फांद्याच वापरल्या होत्या.

दह्यातील वांग्याचे भरीत
वांग्याचे भरीत
चिंचकोळाचे वांग्याचे भरीत

Related

Techniques 6586960313276890717

Post a Comment Default Comments

  1. मायक्रोवे मध्येही वांगे भाजत येते. आधी वांग्याला सुरीने सगळीकडून बोटाच्या पेरा एवढ्या अंतराने उभ्या आडव्या चिरा पाडाव्यात. बटर पेपर खाली ठेवून त्यावर वांगे ठेवावे. मध्यम आकाराच्या वांग्याला छोट्या मायक्रोवे मध्ये १६ मिनिटे लागतात. ८ मिनिटानंतर वांगे उलटावे. आणि वांगे फार शिजलं वाटल्यास लवकर बाहेर काढावे म्हणजे फार काळे होत नाही किंवा कोरडा हि होत नाही. मायक्रोवेमध्ये केल्याने, ते होत असताना तुम्ही इतर कामे करू शकता व साफसफाईचा प्रश्न नाही.

    ReplyDelete
  2. नमस्कार धनलक्ष्मी,
    चांगली कल्पना आहे मी नक्की करून पाहीन पुढच्यावेळी.
    धन्यवाद

    ReplyDelete

item