तांदुळाच्या पिठाच्या चकल्या - Rice Flour Chakali
Rice Flour Chakali in English नग: १५ मध्यम चकल्या वेळ: पूर्वतयारी- १५ मिनिटे | तळणीसाठी - २० मिनिटे साहित्य: १ कप तांदळाचे पीठ १ कप प...
https://chakali.blogspot.com/2011/10/tandalachya-chakalya.html?m=0
Rice Flour Chakali in English
नग: १५ मध्यम चकल्या
वेळ: पूर्वतयारी- १५ मिनिटे | तळणीसाठी - २० मिनिटे
साहित्य:
१ कप तांदळाचे पीठ
१ कप पाणी
१/४ कप बटर
चवीपुरते मीठ (टीप १)
१/२ टीस्पून जिरे
२ टीस्पून वाटलेली मिरची पेस्ट
तळणीसाठी तेल
कृती:
१) तांदळाचे पीठ एका खोलगट भांड्यात घ्यावे.
२) लहान पातेल्यात पाणी गरम करावे. त्यात मीठ, जिरे, मिरचीची पेस्ट आणि बटर घालावे. बटर वितळून पाण्याला उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले कि लगेच तांदळाच्या पिठात घालून चमच्याने मिक्स करावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.
३) कोमट झाले कि मऊसर मळून घ्यावे.
४) चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा आणि तयार उकड भरून घ्यावी. तळणीसाठी तेल गरम करावे. आच मिडीयम आणि हायच्या बरोबर मधोमध ठेवावी.
५) प्लास्टिकच्या लहान कागदावर चकल्या पाडाव्यात (टीप ५) . चकली पाडून झाल्यावर शेवटचे टोक चिकटवून टाकायला विसरू नये.
६) चकल्या बदामी रंगावर तळून घ्याव्यात (टीप २ आणि ३). तळलेल्या चकल्या पेपर टॉवेलवर काढून ठेवाव्यात म्हणजे अधिकचे तेल टिपून घेतले जाईल.
चकल्या पूर्ण गार झाल्या कि डब्यात भरून ठेवाव्यात.
टीपा:
१) मिठाचा अंदाज घ्यायचा तर स्टेप २ मध्ये जेव्हा मीठ घालू तेव्हा पाण्याची चव पहावी. पाणी गरजेपेक्षा थोडे खारट असावे. म्हणजे तांदळाच्या पिठात घातल्यावर मीठ अडजस्ट होते.
२) चकल्या जरा कमी तळल्या तर रंग पांढरा राहतो आणि कुरकुरीतसुद्धा होतात. पण पूर्ण गार झाल्यावर कधीकधी आतमध्ये किंचितशा मऊ राहतात. त्यामुळे जास्त दिवस टिकणार नाहीत म्हणून शक्यतो बदामी रंग येईस्तोवर पक्क्या तळाव्यात.
३) एकदम कमी आचेवर चकल्या तळू नयेत. चकल्या तेलकट होतात.
४) चकली यंत्रातून चकली पाडल्यावर ती उचलताना आणि तेलात सोडताना काळजी घ्यावी. तांदळाच्या पिठाला चिकटपणा कमी असतो. त्यामुळे उचलताना चकल्या मोडतात.
५) प्लास्टिकच्या कागदाचे साधारण ५ x ५ इंचाचे चौकोनी तुकडे करावेत. आणि एका कागदावर एकच चकली पाडावी म्हणजे चकली उचलताना सोपे जाईल. प्लास्टिक कागदाऐवजी अल्युमिनियम फॉईल किंवा बटर पेपर वापरला तरी चालेल.

khup sundar ahe recipe..pan ya cklya jasta tel ghetat ka?what is ur experience?
ReplyDeletemirchi paste aivaji, goda masala ghatla tar chalel ka?
ReplyDeleteहो चालेल. तुम्हाला जर चकली मध्ये गोडा मसाल्याचा स्वाद आवडत असेल तर जरूर घाला.
ReplyDeleteHello Samruddhi,
ReplyDeletediwalichya shubhechha!!
nahi maza experience changla hota.. chakalya ajibat telkat zalya nahit. fakt ekdum barik achevar chakalya talu nayet.. tyamule telkat hotat..
awesome thing!
ReplyDeletegonna try it on my own
thanks
ReplyDeleteवाव, मस्त रेसेपी, लवकरच करून बघणार...
ReplyDeletevaidehi tai,
ReplyDeleteme chakli tumcha receipe pramane keli khup mast zali, thanks a lot.
thanks sampada athavanine kalavlyabaddal!
ReplyDeleteDhanyavad Prasik
ReplyDeleteAttach karun baghato.
ReplyDeletepan aapan non-veg. recipe kaa naahi det?
thanks Sushant
ReplyDeleteme vegetarian ahe tyamule me veg recipes post karte, nonveg nahi banvat
वैदेही ताई
ReplyDeleteमी हि रेसिपिये करून पहिली
सगळ्यांना खूप आवडली .
मी तुझ्या ब्लोग ची fan झाली आहे .
वैदेही ताई
ReplyDeleteमी हि रेसिपिये करून पहिली
सगळ्यांना खूप आवडली .
मी तुझ्या ब्लोग ची fan झाली आहे .
धन्यवाद अमृता
ReplyDeletejwarichi / bhajarichya pithachi chakali yete -----majhi shejarin karit ase pan ata ti nahi :(
ReplyDeleteजर मिरची एवजी तिखट मसाला वापरला तर चालेल का
ReplyDeleteनमस्कार दिपाली
ReplyDeleteतिखट मसाला वापरला तरी चालेल. फक्त रंग लालसर दिसेल चकलीचा.
Hi vaidehi tai aata parayant mazi chakali jamayachich nahi pan tumachya receipe nusar banval tar chakali khupach chan banali...thanks for receipe...
ReplyDeleteThanks Manju,
ReplyDeletetumhala dipawalichya hardik shubhechha !!
MALA PADRI KARANJI CHI RECEIPE SANGA
DeletePadri Karanjya - http://chakali.blogspot.com/2012/11/satyachya-karanjya-kanavle.html
Deletehi vaidehi,
ReplyDeleteaag me karun baghitalya, pan aag tya kurkurit zalya nahit, agdi kadak zalyat g, kashyane zalya asavyat
smita vidahte
Namaskar Smita
ReplyDeleteya chakalya bhajanichya chakali evadhya khuskhushit hot nahit. Pan kadak suddha hot nahit. Butter garam panyat ghalun ukali kadhali hotit na? karan mohan nit padle nasel tarihi chakalya kadak hou shaktat. kinva chakalya kami achevar jast vel talalyas chakalya kadak hou shaktat.
hi vaidehi,
ReplyDeletetumhi sangitlypramane mi kalach kelya chaklya pan vikatche tandul pith hote,khup chan zalya hotya, thanks.....
Pan mala atat ajun karaychya ahet tar mi kontya prakarche tandul vapru, i mean, basmati, indrayani or else.
Deepa
konatyahi prakarche pith chalel.. Basmati vaparaychi garaj nahi.. kontahi sadha tandul vaparava.
ReplyDeletemi keli chan zhaly pun tutat hotya chakali padatana
ReplyDeletebutter evaji dusare kahi vaparle tar chalel ka mhanje tel, kiva ghee vaparle tar chalel ani kiti vaparave .....
ReplyDeleteHi वैदेही, मी आजच केल्या या चकल्या. छान झाल्या. Thanks for the recipe.... चकल्या थोड्या कुडकुडीत झाल्या पण त्याच पिठाच्या कडबोळ्या एकदम कुरकुरीत-खुसखुशीत झाल्या :-)
ReplyDeleteउमा.
butter aivaji dalda ghatla tar chalel ka?
ReplyDeleteRegards,
Saskhi pawar
Ho chalel.
Deletehehe
Deletehi vaidehi,
ReplyDeletetuzya recipies khup chan ani sopya asatat. mala plz ek sang ki tandala chya pithat te garam mishran takalya var part sagala gas var thevaya cha ka. ukad ghenya sathi mi thodi confuse zale ahe.
Akshaya
Hello Akshaya...
DeletePith ukalatya panyat ghatle ki dhavalun aach ekdum barik karaychi... jhakan thevun 2-3 minute thevave. aach band karun takavi, pan zakan kadhu naye. 10-12 minute vaaf muru dyavi.
Pls tell me if i using jwari and rice flour mix then what receipe for that?/???
ReplyDeleterice flour ani jwari pith ekatra karaychya zalya
Deletetar jwari pith kami ghyave... donhi pithana chikatpana agdi kami asto.. tyamule chakalya padtana tutatat.
वैदेहीताई, तांदळाच्या आणि ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो, तर चकल्यानां बाइंडींग येण्यासाठी दोन चमचे मैदा घातला तर चालेल का?
DeleteHo chalel.
Deleteओवा आणि पांढरे तीळ टाकले तर चालेल का?
ReplyDeleteहो चालेल.
DeleteMla ya chaklya karun pahaychet.butter konte vaparayche?cake sathi vaparto te unsalted/cooking butter ki Amul butter pan chalel?
ReplyDeletepadarth tikhatmithacha ahe.. tyamule salted butter vaparle tari chalel..
Deletehi
ReplyDeletehya kiti divas tiktat
15 divas sahaj tiktat.
Delete