दह्यातील वांग्याचे भरीत - Vangyache Bharit

Baigan Bhurta (in yogurt) in English वेळ: १० मिनिटे साधारण १ कप भरीत साहित्य: १ कप भाजलेल्या वांग्याचा गर १/२ कप बारीक चिरलेला कांदा ...

Baigan Bhurta (in yogurt) in English

वेळ: १० मिनिटे
साधारण १ कप भरीत
vangyache bharit, baingan bharta, baingan bhurta, dahyatil vangyache bharitसाहित्य:
१ कप भाजलेल्या वांग्याचा गर
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून तेल, १ चिमटी मोहोरी (ऐच्छिक) , २ चिमटी जिरे, १/४ टीस्पून हिंग
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
२ ते ३ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
३/४ कप किंवा गरजेनुसार दही
चवीपुरते मीठ

कृती:
१) वांग्याचा गर सुरीने थोडा कापून घ्यावा. कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे घालून तडतडेस्तोवर थांबावे. हिंग आणि हिरवी मिरची घालावी. तयार फोडणी वांग्यावर घालावी.
२) कांदा आणि मीठ घालून मिक्स करावे. दही आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत छान लागते.

Related

Marathi 5428418265069041058

Post a Comment Default Comments

 1. Hi
  I like Vange in any form
  I tried it
  and liked it specially because no need to add Peanut powder

  ReplyDelete
 2. yaat jar thodi barik chiraleli lasun takali tar khup khamang chav lagate.

  ekada try karun bagha.

  ReplyDelete
 3. Hi Praju

  Ho nakkich Chan lagel lasun !!

  ReplyDelete
 4. Telachya aivajee tupachi fodani ajun chaan lagate ya bharatamadhye

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item