भाजणीचे वडे - Bhajaniche Vade
Bhajani Vada in English १२ मध्यम आकाराचे वडे वेळ: ३० मिनीटे साहित्य: १ कप थालिपीठाची भाजणी रेसिपीसाठी इथे क्लिक करा २ टेस्पून कोथिंबी...
https://chakali.blogspot.com/2009/12/bhajaniche-vade.html?m=0
Bhajani Vada in English
१२ मध्यम आकाराचे वडे
वेळ: ३० मिनीटे
साहित्य:
१ कप थालिपीठाची भाजणी रेसिपीसाठी इथे क्लिक करा
२ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/२ ते १ टिस्पून लाल तिखट
चिमूटभर हिंग
१/४ टिस्पून हळद
१ टेस्पून तेल मोहनासाठी
तळण्यासाठी तेल
चवीपुरते मिठ
कृती:
१) थालिपीठाच्या भाजणीमध्ये २ टिस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. त्यात कोथिंबीर, लाल तिखट, मिठ, हिंग आणि हळद घालून मिक्स करावे.
२) कोमट पाणी घालून मळून घ्यावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे. तळणीसाठी तेल गरम करावे. मळलेल्या भाजणीचे साधारण १०-१२ छोटे गोळे करावे
३) प्लास्टिकचा कागदाला थोडा पाण्याचा हात लावून त्यावर हातानेच वडा थापावा आणि मधे भोक पाडून गरम तेलात तळून काढावा.
टीप:
१) जर भाजणी खमंग भाजलेली नसेल तर वडे थोडे मऊ पडतात. तसेच भोक न पाडता वडे बनवले तर ते पुरीसारखे फुगतात आणि नंतर मऊ पडतात.
२) पिठ भिजवताना पिठामध्ये १ टिस्पून तिळ, १/४ टिस्पून ओवा आणि १/२ टिस्पून जिरे घातल्यास चव छान लागते.
३) वडे जर तेलात तुटत असतील तर भिजवलेल्या भाजणीत १ ते २ चमचे गव्हाची कणिक घालावी तसेच तिखट मिठही किंचीत वाढवावे.

mala he vade khop awdtat..pan kadhi try nahi kele..aajch karate ata :)thanks for the wonderful receipes..
ReplyDeleteवैदेही एकदम मस्तच होतात गं. तोंडाला पाणी सुटले....आता करतेच. :)मोहन न घालताही होतील ना गं?
ReplyDeleteधन्यवाद भानस,
ReplyDeleteअगं भाजणी चांगली खमंग भाजली असेल तर होतात चांगले मोहन न घालता. पण थोडे मोहन घातलेले चांगले नाहीतर मऊ होतात.
Hi वृषाली,
ReplyDeleteअगं मला पण भयंकर आवडतात हे वडे. बाकी कमेंटसाठी धन्यवाद
Hi Vaidehi,
ReplyDeleteMala mazya lahanpanachi athavan ali. Mazi aai he vade agadi sundar karate. Amhi kombadhi che kalvan ani he vade khaycho. Waa mala ata athavun tondala pani sutle. Aaj itkya divsani tuzyamule mala te chhan divas athavle.
thanks :)
ReplyDeleteHello vaidehi,
ReplyDeleteajach m kelele vade yummi zalele nd mast paus padat hota so ajun tasty lagale!!!!
but vade tuzya vadyan pramane fulale nahe as ka zal asel???
shweta528
Hi Shweta
ReplyDeleteaga thodya practicene yeil.. pith kitpat ghatta malave kinva gas chi aach kitivar thevaychi tyacha ekda andaz ala ki nantar nit fultil.
Hi vaidehi,
ReplyDeleteApan bhajniche dhirde kru shakto ka?
Just for curiosity coz vade oily astat na? :-)
--
Prachi
Hi Prachi
ReplyDeleteHo chalel.. dhirde suddha chhan hotat.
Thanks vaidehi.
ReplyDelete--
Prachi
Wow malaa he vade khul avdtat .mi aaj banvnar ahe .fakt tandul pith vaprun thalipith banvta yete tar vade sudha tase banai shakato ka
ReplyDeletesampi
tandalachya pithache suddha vade banavta yetat. pan bhajani sarkha khamang pana nahi yenar.
DeleteBhajanichya pithat dali sudha ghetat k?????
Deletebhajani recipe chi link me sahitya madhye dili ahe..
Delete